“माझी आई शिस्तीला फार कडक, तिने अनेकदा मला भांडी फेकून मारलीत,” काजोलचा धक्कादायक खुलासा

माझे माझ्या आई आणि वडीलांवर ते एकत्र असतानाही प्रेम होते आणि विभक्त झाल्यावर सुद्धा आहे” असे काजोलने सांगितले.

बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिने अनेक सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. काजोलचा विनोदी स्वभाव हा सर्वांनाच माहिती आहे. अनेक चित्रपटांच्या सेटवर तिने खोड्या करतानाचे अनेक किस्से सांगितले जातात. काजोल लहान असतानाही अत्यंत वात्रट होती. पण तिचा हा खोडकरपणा तिची आई अभिनेत्री तनुजा यांनी मात्र फार शिस्तीने हाताळला. काजोलची आई तनुजा या शिस्तीला फार कडक होत्या, याचा खुलासा खुद्द काजोलने एकदा मुलाखतीदरम्यान केला होता.

काजोलने एकदा प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान तिला तिच्या आईविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी ती म्हणाली, “माझी आई माझ्यावर फार प्रेम करायची. मात्र तिने मला कधीच बिघडू दिले नाही. ती लहानपणापासूनच शिस्तीला फार कडक होती. जर लहान असताना मुलांना मार पडला नाही तर ते बिघडतात, असे तिच्या आईचे म्हणणे होते.”

“यामुळे अनेकदा खोड्या केल्यानंतर मला माझी आई बॅडमिंटन किंवा रॅकेटने मारायची. एवढंच नाही कधी कधी तर ती हातात जे मिळेल ते फेकून मारायची. कित्येकदा तिने मला भांडीही फेकून मारली आहेत,” असा खुलासा काजोलने केला आहे.

मात्र १३ व्या वाढदिवशी तिने मला जवळ घेतले आणि मला म्हणाली, “मी यापुढे तुझ्यावर हात उचलणार नाही. मात्र जर मला वाटलं की तू काही चुकीचं करत आहे, तर मात्र मला ते करावे लागेल. आता तू मोठी झाली आहेस. तुला तुझ्या जबाबदाऱ्यांची जाणीव हळूहळू तुला होत आहे. म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे,” असे तनुजा यांनी काजोलला सांगितले होते.

दरम्यान आई-वडिलांच्या वेगळं होण्याबद्दल काजोलला विचारले असता ती म्हणाली, “साधारणपणे जेव्हा मी साडेचार वर्षांची होते तेव्हा माझे आई-वडील विभक्त झाले. यात चुकीचे असे काही नाही. माझे असे बरेच मित्र-मैत्रिणी आहेत ज्यांचे आई-वडील आजही एकत्र आहे. पण त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आहे. त्यामुळे त्यांचे बालपण खूप छान असे नव्हते. माझे माझ्या आई आणि वडीलांवर ते एकत्र असतानाही प्रेम होते आणि विभक्त झाल्यावर सुद्धा आहे” असे काजोलने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kajol devgan said tanuja is a strict mother who beat me with badminton racket and dishes nrp

ताज्या बातम्या