‘खरंच किती उद्धट स्त्री आहे…’, वाढदिवसाच्या दिवशी काजोल झाली ट्रोल

वाढदिवसाच्या दिवशी चाहते घराबाहेर आल्यानंतर तिच्या वागणुकीमुळ तिला ट्रोल करण्यात आलं आहे.

kajol, kajol birthday, kajol trolled,
काजोल सोशल मीडियावर झाली ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा काल वाढदिवस होता. ५ ऑगस्टला काजोलने तिचा ४७ वा वाढदिवस साजरा केला. आपल्या आवडत्या कलाकाराला त्याच्या वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी लाखो चाहते त्यांच्या घराबाहेर जातात. असेच काही काजोलसोबत झाले. काजोलचा काल वाढदिवस असल्याने काही चाहते तिच्या घराबाहेर तिला शुभेच्छा देण्यासाठी उभे होते. मात्र, काजोलने ज्या प्रमाणे तिच्या चाहत्यांना वागणुक दिली त्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे.

काजोलचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत काजोल तिच्या घराबाहेर काही चाहत्यांना भेटण्यासाठी आली असते. हे चाहते काजोलसाठी वाढदिवसाचा केक आणतात. काजोल केक कापते आणि लगेच आत निघून जाते. ती आत जात असताना तिचा एक चाहता मॅडम एक फोटो असं म्हणतं थांबलेला असतो, हे पाहता एक व्यक्ती म्हणतो आधी फोटो काढायला पाहिजे होतो. मात्र, थोड्याच वेळेत काजोल बाहेर येते आणि चाहत्यांसोबत फोटो काढते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा : शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील ‘या’ आलिशान रेस्टॉरंटमध्ये असते बॉलिवूड कलाकारांची रेलचेल!

kajol, kajol birthday, kajol trolled,
व्हायरल झालेल्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी काजोलला ट्रोल केले आहे.

 

काजोलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘गर्विष्ट स्त्री…या लोकांसाठी एवढं केलंच नाही पाहिजे..यापेक्षा कोणत्या गरीब किंवा मग अनाथ मुलांचा वाढदिवस साजरा करा.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘किती गर्विष्ट आहे ती बघा.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ही तर खरचं उद्धट स्त्री आहे…हीच्या जागेवर जर शाहरुख असता तर त्याने खूप चांगली वागणुक दिली असती.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘तिला सन्मान मिळालाच नाही पाहिजे,’ अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी काजोलला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : प्रियांका अमेरिकावासियांना खाऊ घालतेय ‘मुंबईचा वडापाव’, किंमत ऐकून पळून जाईल भूक

काही दिवसांपूर्वी काजोलचा ‘त्रिभंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kajol gets brutally trolled for showing attitude to poor fans who brought her birthday cake dcp

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या