काजोलच्या हस्ते अजयच्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त

बॉलिवूडकरांना मराठी चित्रपटाचे वेड

काजोल, अजय,ajay devgn
काजोलने केला पत्नी अजयच्या मराठी चित्रपटाचा शुभारंभ
बॉलिवूडकरांना सध्या मराठी चित्रपट निर्मितीचे वेड लागले आहे. प्रियांका चोप्रानंतर अजय देवगणही त्याच्या आगामी मराठी चित्रपटासाठी सज्ज झालाय. त्याच्या आगामी चित्रपटामध्ये मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची समजते. चित्रपटाच्या नावाबद्दल, कथानकाबद्दल आणि त्यातील कलाकारांबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, अजयने पत्नी काजोलच्या हस्ते आपल्या मराठी चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली आहे. काजोलच्याहस्ते मराठी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केल्याचे सांगत त्याने ट्विटरवरुन चित्रपटाचा शुभारंभ झाल्याचा एक फोटो चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या फोटोमध्ये नाना पाटेकर देखील दिसत आहेत.

त्याने शेअर केलेल्या फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटत असून, प्रेक्षक अजयच्या आगामी चित्रपटासाठी अधिक उत्सुक असल्याचे दिसून येते. बॉलिवूडकरांना सध्या मराठी चित्रपटाचे वेड लागले आहे. नुकताच प्रियांका चोप्राच्या निर्मितीमध्ये ‘व्हेंटिलिटर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार देखील पटकवला. जॉन अब्राहम देखील मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची चर्चा आहे. नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ या मराठी चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर मराठी चित्रपटसृष्टीकडे पाहण्याची बॉलिवूडकरांची मानसिकता बदलली आहे. बॉलिवूडचा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर देखील ‘सैराट’च्या रिमेकच्या तयारीला लागला आहे. एकूणच बॉलिवूडकरांना मराठी चित्रपटाचे वेड लागले आहे, असेच म्हणावे लागेल. अजयचा मराठीतील हा पहिला चित्रपट नाही. यापूर्वी त्याने गणेश कदम दिग्दर्शित ‘विटी दांडू’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीतही योगदान दिले आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत दिसले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kajol gives the clap ajay devgns and nana patekar upcomming marathi movies