काजोलचं पहिलं प्रेम माहितीये का?

काजोलने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला फोटो

Kajol
काजोल

सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटी त्यांचे प्रत्येक अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. कधी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून तर कधी ट्विटरवर एखादं ट्विट करून हे सेलिब्रिटी चर्चेत येतात. बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर राहिलेली अभिनेत्री काजोल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नुकताच तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होताना दिसतेय. विशेष म्हणजे, करण जोहरनेही या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे.

या फोटोमध्ये काजोलने तिच्या पहिल्या प्रेमाबद्दल खुलासा केला आहे. कारसोबतचा एक जुना फोटो शेअर करत तिने ती कारला आपलं पहिलं प्रेम असल्याचं म्हटलंय. ‘हे पाहा, मला काय सापडलंय! माझ्या पहिल्या प्रेमासोबतचा माझा फोटो…माझी पहिली कार!!!,’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

वाचा : पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच साराचा दिग्दर्शकांना दगा?

एकेकाळी काजोलचा जिवलग मित्र राहिलेल्या करण जोहरनेही तिच्या या फोटोवर कमेंट केली. त्या कारमध्ये बसल्यानंतर तुझ्या ड्राईव्हिंगचा धसका घेतल्याचं मला अजूनही आठवतंय, असं करणने म्हटलं. तर, तू माझ्या ड्रायव्हिंगचा धसका घेतला असलास तरी माझे गाडीवर नियंत्रण होते, अशी प्रतिक्रिया देत काजोलनेही त्याची थट्टा केली.

मध्यंतरी काजोल आणि करणमध्ये काही कारणांमुळे वाद झाले आणि त्यांच्या मैत्रीत अंतर पडले. मात्र आता हा दुरावा हळूहळू कमी होताना दिसतोय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kajol shares her first love photo on instagram

ताज्या बातम्या