अभिनेत्री काजोलने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारल्या. त्यांच्या प्रश्नांची तिने उत्तरं दिली. त्यातच एका चाहत्याने तिला सुशांतविषयी एक शब्द बोलण्यास सांगितलं. यावर उत्तर देताना काजोल म्हणाली, ‘दु:खद’. या प्रश्नोत्तरामध्ये काजोलने नवोदित कलाकारांसाठीही महत्त्वपूर्ण सल्ला दिला. ‘जसे आहात तसे राहा. कोणाची कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका’, असा सल्ला तिने दिला.
आणखी वाचा : “माझ्याशी पंगा घेतलास तर..”; सोनू निगमचा भूषण कुमारला इशारा
काजोल ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात अजय देवगणसोबत झळकली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. सध्या काजोल तिच्या कुटुंबीयांसोबत क्वारंटाइनचा वेळ घालवत आहे. सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असून विविध फोटो व व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.