scorecardresearch

…तर ‘जोश’मध्ये ऐश्वर्याच्या जागी ‘या’ अभिनेत्रीने साकारली असती शाहरुखच्या बहिणीची भूमिका

‘इरुवर’ या तामिळ चित्रपटाद्वारे तिने अभिनयाचा श्रीगणेशा केला.

…तर ‘जोश’मध्ये ऐश्वर्याच्या जागी ‘या’ अभिनेत्रीने साकारली असती शाहरुखच्या बहिणीची भूमिका
srk josh aiwsharya rai

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री आणि मिस वर्ल्डचा किताब जिंकलेली ऐश्वर्या राय जितकी तिचं सौंदर्य आणि डोळ्यांमुळे प्रसिद्ध आहे. तितकीच तिच्या अभिनयामुळे आहे. ‘इरुवर’ या तामिळ चित्रपटाद्वारे तिने अभिनयाचा श्रीगणेशा केला होता. मात्र तिच्या अभियानाची भुरळ बॉलीवूडला देखील पडली.

२००० साली प्रदर्शित झालेल्या ‘जोश’ चित्रपटात तिने किंग खान अर्थात शाहरुख खानच्या बहिणीची भूमिका साकारली होती. करियरच्या सुरवातीलाच तिला शाहरुखच्या बहिणीची भूमिका करायला मिळाली खरी पण यासाठी निर्मात्यांची पहिली पसंती मात्र ऐश्वर्याला नव्हती. तिच्याआधी ही भूमिका अभिनेत्री काजोलला ऑफर करण्यात आली होती. मात्र काही कारणाने तिने या भूमिकेसाठी नकार दिला आणि ही भूमिका ऐश्वर्याच्या पदरात पडली.

‘लाल सिंग चड्ढा’साठी करीना नव्हे तर ‘या’ अभिनेत्रीला होती पहिली पसंती, आमिर खानचा खुलासा

‘जोश’नंतर शाहरुख आणि ऐश्वर्या यांनी ‘देवदास’, ‘मोहब्बते’ या चित्रपटांमध्ये प्रियकरांच्या भूमिका साकारल्या. ‘शक्ती’ या चित्रपटात दोघे एका आयटम सॉंगमध्ये झळकले होते. प्रेक्षकांनी देखील त्यांच्या जोडीला पसंती दर्शवली होती.

२००० साली आलेला ‘जोश’ हा चित्रपट ‘वेस्ट साईड स्टोरी’ या हॉलीवूडच्या चित्रपटावर बेतला होता. या चित्रपटात गोव्यातील पार्श्वभूमी दाखवण्यात आली होती. मन्सूर खान यांनी ‘जोश’ चित्रपट दिग्दर्शित केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kajol was first choice for shahrukh khan sister in josh spg

ताज्या बातम्या