बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे अभिनेता अजय देवगण आणि काजोल. एकेकाळी त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जादू केली होती. अजय आणि काजोलला एक मुलगी आहे न्यासा. ती सध्या न्यूयॉर्कमध्ये तिचे शिक्षण घेत आहे. एका कार्यक्रमात काजोलला न्यासाच्या बॉयफ्रेंडबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
काजोलने नुकतीच ‘फिट अप विथ स्टार’ या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी तिला न्यासाच्या सिक्रेट बॉयफ्रेंडविषयी कळाले तर कशी प्रतिक्रिया असेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मजेशीर उत्तर देत काजोलने अजयची प्रतिक्रिया कशी असेल हे पहिले सांगितले आहे. ‘अजयला जर न्यासाच्या बॉयफ्रेंड विषयी कळाले तर तो दरवाजात शॉटगन घेऊन उभा राहिल’ असे काजोलने मजेशीर अंदाजात म्हटले आहे.
PHOTOS: काजोल आणि अजय देवगणचा बंगला आहे की ‘5 स्टार’ हॉटेल?; हे फोटो पाहा
View this post on Instagram
यापूर्वी काजोल आणि अजयने ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी काजोलने अजय सतत दोन्ही मुलांची चिंता करत असतो असे सांगितले होते. जेव्हा न्यासा बाहेर जाते तेव्हा ती घरी येईपर्यंत अजय अस्वस्थ असतो. तो एका ठिकाणी बसून राहतो. न्यासा कुठे गेली आहे? कधी परत येणार? ती काय करते? असे प्रश्न तो सारखे विचारत असतो असे काजोल म्हणाली होती.
न्यासा आताच १८ वर्षांची झाली आहे. २० एप्रिल रोजी न्यासाचा १८वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी काजोल आणि अजयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. न्यासा सध्या न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत आहे. त्यासाठी अजयने न्यूयॉर्कमध्ये नवे घर खरेदी केल्याचे देखील म्हटले जात होते.