…म्हणून कमल हासन यांनी केले होते सारिकाशी लग्न

१९८८ मध्ये कमल हासन आणि सारिका यांनी लग्न केले होते

कमल हासन हे नाव आता कोणत्याही व्यक्तीला नवीन राहिलेले नाही. केवळ कलाविश्वच नाही तर राजकीय वर्तुळातही त्यांच्या नावाचा दबदबा असल्याचे पाहायला मिळते. ते बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देखील तितकेच लोकप्रिय आहेत. ‘सदमा’,’चाची 420′ असे सुपरहिट चित्रपट देणारे अभिनेते कमल हासन यांचा आज ७ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यांनी आपल्या प्रयोगशील अभिनयाने एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे.

कमल हासन केवळ उत्कृष्ठ अभिनेताच नसून लोकप्रिय दिग्दर्शक व प्लेबॅक सिंगर म्हणून ओळखले जातात. कमल हासन यांनी एक बाल कलाकार म्हणून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. ‘कलाथुर कन्नामा’ हा त्यांचा पहिलावहिला चित्रपट होता. त्यानंतर ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. त्यानंतर ‘सागर’, ‘गिरफ्तार’, ‘जरा सी जिंदगी’, ‘राज तिलक’, ‘एक नई पहेली’, ‘चाची 420’, ‘हे राम’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. त्यातील ‘चाची 420’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई करत कमल हासन यांनी साकारलेल्या स्त्री भूमिकेचे कौतुक झाले.
आणखी वाचा : अभिनेत्रीने दिली प्रेमाची कबूली, लवकरच गर्लफ्रेंडसोबत अडकणार लग्नबंधनात

कमल हासन यांच्या अभिनयासोबतच अफेअरच्या चर्चा देखील त्यावेळी जोरदार रंगल्या होत्या. कमल हासन यांचे ७०च्या दशकात अभिनेत्री श्रीविद्यासोबत अफेअर होते. त्यानंतर १९७८ साली कमल हासन यांनी वाणी गणपतीसोबत लग्न केले. मात्र त्यांचा संसार १० वर्षे टिकला. त्यानंतर कमल हासन यांच्या आयुष्यात सारिकाची एण्ट्री झाली. कमल हासन आणि सारिका लिव्ह इनमध्ये राहू लागले होते. मात्र सारिका गर्भवती असल्याचे समजताच १९८८ मध्ये त्यांनी विवाह केला असल्याच्या चर्चा होत्या. त्यांना श्रृती आणि अक्षया या दोन मुली आहेत. कमल हासन यांनी २००४ मध्ये सारिकापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर कमल हासन यांनी २२ वर्षांनी लहान असलेल्या सिमरनला डेट करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांचे हे नातेही फार काळ टिकले नाही. सिमरनने तिच्या बालपणीच्या मित्रासोबत लग्न केले. या सर्वानंतर कमल हासन यांच्या आयुष्यात गौतमीची एण्ट्री झाली. त्यावेळी त्यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र १३ वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहून अखेर २०१६ मध्ये दोघांनी नात्याला पूर्णविराम दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kamal haasan birthday special to know about his personal life why he get marry with sarika avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या