अभिनयानंतर राजकारणात नवीन इनिंग सुरू करू पाहणारे सुप्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी एका साप्ताहिकात स्फोटक लेख लिहिला आणि या लेखाची सर्वत्र चर्चा होऊ लागली. तामिळ भाषेतील ‘आनंदा विकटन’ या साप्ताहिकात त्यांनी हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही, असं कोणीच म्हणणार नाही. यापूर्वी हिंदुत्ववाद्यांचा चर्चा करण्यावर विश्वास असायचा. पण आता ते हिंसाचारातही सहभागी होऊ लागले आहेत, असं नमूद केलं होतं. या लेखावर तामिळनाडूत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर आता सोशल मीडियावर चार वर्षांच्या मुलाचा एक व्हिडिओ पाहून ते अस्वस्थ झाले आहेत. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी दु:ख व्यक्त केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा कमल हसन यांचा पोस्टर चाकूने फाडताना दिसतोय. धोतर नेसलेल्या या लहान मुलाच्या कपाळावर विभूती पाहायला मिळतेय. हा मुलगा पोस्टर फाडत असताना मागून एक व्यक्ती त्याला पोस्टर फाडण्यासाठी भडकावण्याचा प्रयत्न करत आहे. हा माणूस हिंदूंच्या विरोधात आहे, असं तो तमिळ भाषेत त्या लहान मुलाला सांगतोय.

व्हिडिओ शेअर करत कमल हसन यांनी ट्विटरवर लिहिलं की, “माझ्या लहानग्या, मला चाकूने भोसकून ठार करणं एका लहान मुलासाठी ठीक आहे. माझा वयाने वाढलेला भाऊ तमिळ भाषेत बोलत असून, मला दुषण लावत आहे. एक दिवस मला नैसर्गिकरित्या मरायचेच आहे. मला ठार करण्याचा प्रयत्न करा. मी नक्कीच जिंकेन.”

कमल हसन यांनी त्यांच्या लेखान, ‘जनतेचा सत्यमेव जयते’वरील विश्वास उडाला आहे’, असंही नमूद केलं होतं. ‘तामिळनाडूच्या तुलनेत केरळ सरकारने धार्मिक हिंसाचार चांगल्या पद्धतीनं हाताळला आहे’, असं सांगत त्यांनी केरळ सरकारचं कौतुकही केलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamal haasan expresses distress over video of child stabbing his poster
First published on: 15-11-2017 at 17:42 IST