scorecardresearch

Vikram Trailer : कमल हासन यांचा धमाकेदार अ‍ॅक्शन अवतार, बहुचर्चित ‘विक्रम’चा ट्रेलर पाहिलात का?

कमल हासन यांचा बहुचर्चित चित्रपट ‘विक्रम’चा हिंदी ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

kamal haasan, kamal haasan film, vikram, vikram trailer, vikram trailer release, vikram hindi trailer, विक्रम, विक्रम हिंदी ट्रेलर, विक्रम ट्रेलर, कमल हासन, कमल हासन चित्रपट
बहुचर्चित चित्रपट 'विक्रम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

प्रसिद्ध अभिनेता कमल हासन बऱ्याच मोठ्या काळानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. २०१८ मध्ये ते ‘विश्वरुमम’ चित्रपटात दिसले होते. त्यांचा हा चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता त्यांचा बहुचर्चित चित्रपट ‘विक्रम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर हिंदी भाषेत प्रदर्शित झाला. ज्यात कमल हासन यांचा दमदार अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे.

ट्रेलरची सुरुवात कमल हासन यांच्या जबरदस्त डायलॉगनं होते. कमालीच्या सस्पेन्ससोबतच या ट्रेलरमध्ये कमल हासन यांचा अँग्री यंग मँन लुक पाहायला मिळत आहे. चित्रपटात ते हातात हत्यार घेऊन ते शत्रूचा सामना करताना दिसणार आहेत. ६७ वर्षीय कमल हासन यांचा या चित्रपटात अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा- का होतोय #BoycottDhaakad ट्रेंड? ट्विटरवरून कंगनावर व्यक्त केला जातोय राग

‘विक्रम’च्या २ मिनिटं आणि ३८ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये कमल हसन यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन लोकेश कनगराजी यांनी केलं आहे. हा चित्रपट तमिळ व्यतिरिक्त हिंदी भाषेत ३ जून २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता विजय सेथुपथीची देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kamal haasan film vikram trailer release today in hindi mrj

ताज्या बातम्या