लग्न न करता तब्बल १३ वर्षे एकत्र राहिलेल्या दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन आणि अभिनेत्री गौतमी तडिमल्ला यांच्या नात्याची एकेकाळी संपूर्ण दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत चर्चा होती. एकमेकांच्या सुख-दुःखात साथ देणाऱ्या या जोडीचं नातं अखेर तुटलं. त्यांच्या नात्याचा हा प्रवास अनेकांसाठी आजही चर्चेचा विषय आहे.
२००० च्या दशकात सुरू झालेलं नातं. १९८० आणि १९९० च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले कमल हासन आणि गौतमी तडिमल्ला यांच्यात काही वर्षांनंतर जवळीक निर्माण झाली. सुमारे २००४-२००५ च्या दरम्यान दोघांनी लग्न न करता लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यांचं नातं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या लिव्ह-इन रिलेशनशिपपैकी एक ठरलं.
१३ वर्षे एकत्र राहिले, पण कधीच लग्न केलं नाही
न्यूज १८च्या वृत्तानुसार कमल हासन आणि गौतमी तडिमल्ला जवळपास १३ वर्षे एकाच घरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले. मात्र इतका काळ एकत्र राहूनही त्यांनी कधीच लग्न केलं नाही. दोघांनी आपल्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली होती आणि अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही ते एकत्र दिसायचे. दोघेही त्यांच्या आधीच्या जोडीदारांपासून विभक्त झाल्याने लग्न न करता एकत्र राहण्याचा त्यांचा निर्णय त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता.
कमल हासन यांच्या प्रत्येक सुख-दुःखात गौतमी खंबीरपणे उभ्या राहिल्या कमल हासन आणि गौतमी यांच्या रिलेशनशिपदरम्यान, गौतमी या त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार मानल्या जात होत्या. वैयक्तिक आयुष्याबरोबरच त्यांनी कमल हासन यांच्या व्यावसायिक आयुष्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या काही चित्रपटांसाठी कॉस्च्युम डिझाइन करण्याचं कामही गौतमी यांनी केलं होतं. याशिवाय, त्यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत कमल हासन यांच्या मुलींशीही जिव्हाळ्याचं नातं निर्माण केलं होतं.
कॅन्सरशी लढताना कमल हासन यांनी दिली खंबीर साथ
२००४ मध्ये गौतमी यांना स्तनाच्या कर्करोगाचं (ब्रेस्ट कॅन्सरचे) निदान झालं होतं. त्यानंतर त्यांनी दीर्घकाळ उपचार घेतले आणि अखेर त्या कर्करोगमुक्त झाल्या.या कठीण काळात कमल हासन कायम त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी गौतमी यांना भावनिक आधार दिला. आयुष्यातील अत्यंत आव्हानात्मक टप्प्यातही दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. मात्र, ऑक्टोबर २०१६ मध्ये गौतमी यांनी जवळपास १३ वर्षांचं नातं संपल्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला, कारण सार्वजनिक आयुष्यात ही जोडी कायम स्थिर आणि आनंदी असल्याचं चित्र दिसत होतं. कमल हासन यांच्यापासून विभक्त होण्याची घोषणा करताना गौतमी यांनी हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी निर्णय असल्याचं म्हटलं होतं.त्यांनी स्पष्ट केलं की, हा निर्णय घाईघाईत घेतलेला नव्हता. अनेक वर्षे दिर्घकाळ विचार केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. गौतमी यांच्या मते, स्वतःचं भविष्य आणि आपल्या मुलीचं हित लक्षात घेऊन सर्व बाजूंचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतरच त्यांनी हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला.
नंतर दिलेल्या काही मुलाखतींमध्ये गौतमी यांनी सांगितलं की, काळानुसार कमल हासन यांच्यामध्ये बदल होत गेला. त्यांच्या मते, दोघांमध्ये हळूहळू वैचारिक मतभेद वाढले, ज्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर झाला. मात्र, त्यांनी कोणतेही खळबळजनक आरोप केले नाहीत. तरीही त्यांच्या या वक्तव्यांमुळे दोघांच्या विभक्त होण्यामागचं नेमकं कारण काय होतं, याबाबत चाहत्यांमध्ये आणि माध्यमांमध्ये मोठी चर्चा रंगली.
गौतमी यांनी सांगितलं की, आपल्या मुलीचं सुरक्षित आणि स्थिर भविष्य हे कमल हासन यांच्यापासून विभक्त होण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक होतं. त्यांच्या मते, मुलीच्या हितासाठी योग्य निर्णय घेणं हीच त्या काळातील सर्वात मोठी जबाबदारी होती. त्यामुळे भविष्यात तिचं आयुष्य सुरक्षित आणि स्थिर राहावं, यासाठी त्यांनी हा कठीण निर्णय घेतला. गौतमी यांनी स्पष्ट केलं की, आई म्हणून मुलीचं कल्याण आणि भविष्य यांनाच प्राधान्य देत त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय घेतला.
