Celebrities congratulate CM Joseph Vijay : तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जोसेफ विजय यांनी शपथ घेतली आहे. चेन्नईमधील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला असून, सर्वत्र या सोहळ्याची चर्चा दिसून येत आहे. जोसेफ विजय यांच्या TVK पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करीत एकूण १०८ जागांवर विजय मिळवला. त्यानंतर काँग्रेस आणि इतर स्थानिक नेत्यांच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली. राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन विश्वातून जोसेफ विजय यांचे अभिनंदन केले जात आहे. सिनेविश्वातील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींकडून विजय यांना नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
कमल हासन यांची जोसेफ विजयसाठी खास पोस्ट
अभिनेते कमल हासन यांनी एक्सवर पोस्ट करीत जोसेफ विजय यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी यांच्या जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली तमिळनाडूची भरभराट होवो, अशी सदिच्छा व्यक्त केली. त्याचबरोबर जोसेफ विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिलेले गीतकार विवेक यांनी, “माझ्या ऑडिओ लाँचसाठी मी या ठिकाणी अगणित वेळा आलो आहे; पण आजचा अनुभव पूर्णपणे वेगळा वाटतो आहे”, असे एक्सवर लिहिले.
यापुढे मुख्यमंत्री विजय सर… – पूजा हेडगे
अभिनेता अर्जुन रामपाल याने महाकालचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने जोसेफ विजय यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. विजयला यश मिळाले याचा आनंद झाला, अशी प्रतिक्रिया अर्जुनने व्यक्त केली. त्याचबरोबर अभिनेता प्रकाश राज यांनीही एक्सवर पोस्ट करून विजयला शुभेच्छा दिल्या. तुमच्या शासनकाळामध्ये तमिळनाडू राज्याची प्रगती होवो, असे अभिनेते प्रकाश राज यांनी लिहिले. त्याचबरोबर अभिनेत्री पूजा हेगडे हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर जोसेफ विजय यांच्या शपथविधीचा फोटो शेअर केला. तसेच तिने, “अरे व्वा! अभिनेते विजय किंवा आता असे म्हटले पाहिजे की, मुख्यमंत्री विजयसर,” अशा शब्दांत सदिच्छा दिल्या आहेत.
Congratulations to Chief Minister Vijay. Wishing you the best to succeed in your new responsibility . May the state thrive in your governance too.
— Prakash Raj (@prakashraaj) May 10, 2026
तमिळनाडू राज्याचा निकाल हाती आल्यानंतर लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याने जोसेफ विजय यांना शुभेच्छा दिल्या होत्या. ‘थलपती’ लाटेचे कौतुक करीत हा तमिळनाडूतील राजकारणातील नवीन टप्पा असल्याचे म्हणत विजय देवरकोंडाने जोसेफ विजय यांना शुभेच्छा दिल्या.
Have been here countless times for My Man’s audio launches. This feels completely different ?❤️ pic.twitter.com/8PM8pTVFYD
— Vivek (@Lyricist_Vivek) May 10, 2026
शपथविधी सोहळ्याला त्रिशा कृष्णनची उपस्थिती
जोसेफ विजय यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी अभिनेत्री त्रिशा कृष्णन उपस्थित होती. त्रिशाच्या उपस्थितीची जोरदार चर्चा रंगलेली दिसून आली. निळ्या रंगाच्या रेशमी साडीमध्ये त्रिशाचे सौंदर्य आणखीनच खुलले होते. काही महिन्यांपासून त्रिशा कृष्णन आणि जोसेफ विजय यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, दोघांनीही आपल्या नात्याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.
