scorecardresearch

याला म्हणतात स्वॅग! आलिशान गाडीने नाही तर चक्क हेलिकॉप्टरमधून शूटिंगला येतो ‘हा’ भारतीय अभिनेता

फक्त प्रसिद्धीच्या बाबतीतच नाही तर संपत्तीच्या बाबतीतही ते जगभरातील बड्या स्टार्सना टक्कर देत आहेत.

kamal haasan

गेल्या काही वर्षात दाक्षिणात्य कलाकारांनी जगभरात आपला डंका वाजवला आहे. उत्तमोत्तम चित्रपट देत दाक्षिणात्य चित्रपट जगभरात प्रसिद्ध होत आहेत. त्याचप्रमाणे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करणारे कलाकारही फक्त प्रसिद्धीच्या बाबतीतच नाही तर संपत्तीच्या बाबतीतही जगभरातील बड्या स्टार्सना टक्कर देत आहेत. आता एक सुप्रसिद्ध अभिनेते लग्झरी गाडीतून नाही तर थेट हेलिकॉप्टरने शूटिंगसाठी यायचे असं समोर आलं आहे.

अनेक दाक्षिणात्य अभिनेते मानधनाच्या बाबतीत बॉलिवूड सेलिब्रिटींच्याही पुढे आहेत. यातीलच एक म्हणजे अभिनेते कमल हासन. कमल हासन यांचं दिसणं, त्यांचा अभिनय, त्यांची देहबोली हे सगळंच चाहत्यांना आकर्षित करणारं आहे. त्याचमुळे आजही त्यांच्या नावाची जादु काही कमी झालेली नाही. त्यांच्या ‘विक्रम’ या चित्रपटाने ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई करुन मोठा विक्रम केला होता. सुपरस्टार रजनीकांत यांच्यानंतर प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते म्हणून कमल हासन यांचे नाव घ्यावे लागेल. 

आणखी वाचा : ‘पठाण’ आणि ‘आरआरआर’ भिडणार चित्रपटगृहात, राजामौली यांचा ऑस्कर नामांकित चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

तर कमल हासन सध्या त्यांच्या आगामी ‘इंडियन २’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. लवकरच त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली. कमल हासन सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या पहिला भाग सुपरहिट झाला होता. त्यामुळे आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. याच चित्रपटाच्या सेटवर कमल हासन आलिशान गाडी नाही तर रोज चक्क हेलिकॉप्टरमधून येतात, असं समोर आलं आहे.

हेही वाचा : अक्षय कुमार नाही तर ‘हे’ दाक्षिणात्य अभिनेते आहेत सर्वाधिक कमाई करणारे कलाकार, मानधनाचे आकडे ऐकून व्हाल थक्क

आता कमल हासन यांचा हा अंदाज पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. या चित्रपटासाठी कमल हसन यांनी १५० कोटी रुपये घेतले आहेत असंही बोललं जात आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 17:03 IST