अभिनेता केआरके म्हणजेच कमाल राशिद खान त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर फार सक्रीय आहे. केआरके ट्विटच्या माध्यमातून प्रामुख्याने बॉलिवूडवर टीका करत असतो. त्याने स्वत:चे एक यूट्युब चॅनलसुद्धा सुरू केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो चित्रपटांचे समीक्षण करत त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. काही वादग्रस्त ट्विट्समुळे केआरके कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.

केआरकेने २०२० मध्ये निधन झालेल्या इरफान खान आणि ऋषी कपूर या दोन दिग्गज कलाकारांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. यामुळे त्याला मुंबई पोलिसांनी ३० ऑगस्ट रोजी अटक केली. मुंबई पोलिसांनी केआरकेला विमानतळावर अटक केली आणि दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले. वादग्रस्त ट्विट्समुळे त्याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याचदरम्यान त्याच्या विरोधात तीन वर्षांपूर्वीच्या खटल्याच्या संदर्भातला गुन्हा दाखल झाला आहे. एका नवोदित अभिनेत्रीने त्याच्यावर छेडछाड केल्याचा दावा केल्याने वर्सोवा पोलिसांनी केआरकेला पुन्हा अटक केली आहे.
आणखी वाचा- अटकेनंतर काही तासांमध्येच केआरकेची प्रकृती बिघडली, अभिनेता रुग्णालयात दाखल

Case against five persons in case of death of worker due to crane hook falling on head
पुणे : डोक्यात क्रेनचा हुक पडून कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
Actor Sonu Sood made an anonymous post about trolling of Hardik Pandya
IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद
Virat Kohli Asks Fans to Stop Calling him King as he feels embarrassed
IPL 2024: “प्लीज मला ‘त्या’ नावाने हाक मारू नका कारण…” विराट कोहलीने चाहत्यांना केली विनंती

२७ वर्षांच्या पीडित अभिनेत्रीने केआरकेने आपली छेडछाड केल्याचा दावा केला आहे. “२०१७ मध्ये मी मुंबईला कामाच्या शोधात आले. त्यांनतर एका पार्टीमध्ये माझी केआरकेशी भेट झाली. आपण निर्माते आहोत आणि तुला काम देऊ इच्छितो असे म्हणत केआरकेने माझ्याशी जवळीक वाढवली. ‘कॅप्टन नवाब’ या चित्रपटामध्ये इमरान हाश्मीसोबत कास्ट करणार असल्याचे आश्वासन त्याने दिले. पण तसे काहीच झाले नाही. याउलट त्याने माझा नंबर मिळवून मला फोन करुन त्रास द्यायला सुरुवात केली.” असे तक्रार करणाऱ्या अभिनेत्रीने सांगितले.

आणखी वाचा- विश्लेषण : शाहरुख खान, अक्षय कुमारसारख्या कित्येकांशी पंगा घेणारा केआरके आहे तरी कोण?

पुढे ती म्हणाली की, “२०१९ मध्ये मला केआरकेने त्याच्या घरी वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने बोलावले. काही कारणांमुळे मला त्या पार्टीला जाणे शक्य झाले नाही. म्हणून मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सातच्या आसपास त्याच्या घरी गेले. घरात गेल्या-गेल्या त्याने मला त्याच्या खोलीत नेले. खोलीत गेल्यावर केआरकेने सरबत प्यायला दिले. ते प्यायल्यावर मला चक्कर यायला लागली. त्या अवस्थेमध्ये असताना त्याने माझा हात पकडला. माझ्याकडे सेक्सची मागणी करत त्याने माझी छेड काढली.” जून २०२१ मध्ये केआरकेच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३५४ आणि आयपीसी ५०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर केआरकेच्या वकीलांनी अभिनेत्रीने छेडछाडीनंतर १८ महिने झाल्यावर तक्रार केली असून हे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.