कमाल आर खान आणि सलमान खान यांच्यातील वाद काही नवीन नाही. अनेकदा केआरके सलमान खानवर टीका करताना दिसतो. ज्यामुळे त्याला ट्रोलही व्हावं लागलं आहे. एवढंच नाही तर सलमानच्या लीगल टीमनं त्याला नोटीसही पाठवली होती. पण शांत राहिल तो केआरके कसला. बिग बॉसच्या घरातून उमर रियाज बाहेर पडल्यानंतर त्यानं आता पुन्हा एकदा सलमान खानचं नाव न घेताच त्याच्यावर निशाणा साधला आहे. त्यानं सलमानबाबत केलेलं एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

प्रतीक सहजपालशी झालेल्या भांडणानंतर उमर रियाज बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाला. त्यानंतर केआरकेनं केलेलं एक ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. ज्यात त्यानं सलमानचं नाव न घेताच तो आउटसाइडर्सचा तिरस्कार करतो असं म्हटलं आहे. त्यानं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘मी बिग बॉस शो पाहत नाही. पण ऐकिवात आहे की बिग बॉसच्या घरातील सदस्य उमर रियाजसोबत अन्याय झाला आहे. मी कधीपासून सांगत आहे की हा माणूस चुकीचा आहे. तो बाहेरच्या सर्व लोकांचा तिरस्कार करतो. तो आपल्या अहंकारात आंधळा झाला आहे.’

Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Bengluru
VIDEO : ‘जय श्री राम’ म्हटल्याने बंगळुरूमध्ये तिघांवर हल्ला, झेंडाही पळवला
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?

केआरकेनं आपल्या ट्वीटमध्ये थेट सलमान खानचं नाव घेतलेलं नाही मात्र त्याचा रोख सलमानकडेच आहे हे कोणाच्याही लक्षात येईल. याआधीही केआरकेनं सलमान खानवर टीका केली आहे. ज्यामुळे त्याला सलमान खानच्या लीगल टीमनं नोटीस पाठवली होती. त्यानंतर त्यानं सलमानच्या विरोधात कोणतीही पोस्ट करणार नसल्याचं म्हटलं होतं. पण आता त्यानं सलमानचं नाव न घेता केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान ‘तिकिट टू फिनाले’ उमर रियाज आणि प्रतीक सहजपाल यांच्यात कडाक्याच भांडण झालं होतं. त्यानंतर काही लोकांनी उमर रियाजला घरातून बाहेर काढण्याची मागणी केली होती. रविवारी झालेल्या ‘विकेंड का वार’मध्ये सलमान खान देखील उमर रियाजच्या या वागणुकीबाबत त्याच्यावर चिडलेला पाहायला मिळाला. त्यानं उमरला चांगलंच सुनावलं देखील होतं.