scorecardresearch

“ते म्हणायचे तू तर मुलीलादेखील विकशील… वाटायचं त्यांचा गळा कापावा”, काम्या पंजाबीने व्यक्त केला संताप

दुसरं लग्न केल्यानंतरही काम्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

“ते म्हणायचे तू तर मुलीलादेखील विकशील… वाटायचं त्यांचा गळा कापावा”, काम्या पंजाबीने व्यक्त केला संताप

अभिनेत्री काम्या पंजाबी तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली आहे. २०१३ सालामध्ये काम्याचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर २०२० सालामध्ये तिने दिल्लीतील डॉक्टर शलभ दांग यांच्याशी दुसरं लग्न केलं. पहिलं लग्न मोडल्यानंतर काम्या काही दिवस अभिनेता करण पटेलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. यावेळी अनेकांनी काम्याला ट्रोल केलं. काम्याचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर दुसरं लग्न केल्यानंतरही तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

नुकतीच काम्याने रितेश देशमुख आणि जिनिलियाच्या ‘लेडीज वर्सेज जेंटलमैन 2’ या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये काम्याने ट्रोल करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला. तसचं या शोमध्ये घटस्फोट आणि दुसऱ्या लग्नामुळे अनेकांनी ट्रोल केल्याचं शिवाय मुलीलादेखील यात खेचलं गेल्याचं दु:खही तिने व्यक्त केलंय.

काम्या पंजाबीने तिच्या पहिल्या घटस्फोटोनंतर अनेकांची टीका सहन करावी लागल्याचं सांगितलं ती म्हणाली, “माझं पहिलं लग्न मोडलं तेव्हा मला ट्रोल केलं गेलं. त्यानंतर मी एका रिलेशनशिपमध्ये होते तेव्हाही मला खूप वाईट पद्धतीने ट्रोल करण्यात आलं. मला म्हणायचे तू तर म्हातारी आहेस. तुझा घटस्फोट झालाय… तुला तर हा देखील सोडून देईल.. तू तर मुलीलादेखील विकशील… म्हणजे माझी मुलगी अगदी पाच वर्षांची होती तेव्हा तिला देखील ट्रोल केलं गेलं.” असं म्हणत काम्याने ट्रोलिंगवर दु:ख व्यक्त केलं.


पुढे ती म्हणाली, “मी काय घालते, कशी दिसते यावर कोण काय म्हणतंय याचा मला काही फरक पडतं नाही… जे बोलायचंय ते बोला. मात्र जेव्हा यात माझ्या मुलीबद्दल बोललं जातं तेव्हा असं वाटतं त्यांचा गळा कापावा” असं म्हणत काम्याने संताप व्यक्त केला.

अखेर अंकिता लोखंडे बोहल्यावर चढणार, ‘या’ तारखेला बॉयफ्रेण्ड विक्की जैनसोबत करणार लग्न


२००३ सालामध्ये बंटी नेगीसोबत काम्या पंजाबीचं पहिलं लग्न झालं होतं. लग्नाच्या १० वर्षांनंतर त्यांच्या घटस्फोट झाला. काम्या आणि बंटीला आरा ही मुलगी तर ईशान हा मुलगा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या