‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होताच या शोने प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेतलंय. तर अवघ्या दोन दिवसातच शोमध्ये खूप सारा ड्रामा सुरु झाल्याचं पाहायला मिळालंय. एवढचं नव्हे तर या शोमध्ये अभिनेत्री स्नेहा वाघ आणि तिचा पहिला पती अविष्कार दोघांनी सहभाग घेतला असल्याने कोणता नवा ड्रामा पाहायला मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

स्नेहाने ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये प्रवेश करताच स्नेहाच्या वैहाहिक जीवनाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. स्नेहा वाघने १९व्या वर्षी अभिनेता अविष्कार दारव्हेकरसोबत लग्न गाठ बांधली होती. मात्र काही काळातच ते विभक्त झाले. तर स्नेहाचं दुसऱं लग्नदेखील फार काळ टिकलं नाही. एका मुलाखतीत स्नेहाने तिच्या दोन्ही अपयशी ठरलेल्या लग्नांचा खुलासा करत त्यामागचं कारणदेखील सांगितलं होतं. स्नेहाच्या वैवाहिक जीनवाच्या चर्चा रंगू लागल्यानंतर अभिनेत्री काम्या पंजाबीने स्नेहावर निशाणा साधला आहे.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

ट्वीटमध्ये काम्या पंजाबी म्हणाली, “तुला बिग बॉसच्या घरात यायचं होतं चांगली गोष्ट आहे. तू आलीस देखील. मात्र विक्टिम कार्ड कशाला खेळते. तुझ्या पहिल्या लग्नाबद्दल कल्पना नाही मात्र दुसऱ्या लग्नाबद्दल काहीही कहाण्या नको सांगूस. तेही या चार दिवसांच्या गेमसाठी. तुला चांगलं माहितेय मी सत्य बाहेर आणू शकते. अशा वाईट पद्धतीने खेळू नकोस” असं म्हणत काम्याने स्नेहाला फटकारलं आहे.

अगदी कमी वयात म्हणजेच अवघ्या १९ वर्षांची असताना स्नेहाने अविष्कारसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र काही वर्षातच ते विभक्त झाले. स्नेहाने अविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. एका मुलाखतीतमध्ये स्नेहा वाघने तिला घरगुती हिंसाचाराचा समाना करावा लागला असून तो काळ तिच्यासाठी खूपच कठीण असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर तब्बल ७ वर्षांनी स्नेहाने दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्नेहाने इंटेरियर डिझायन असलेल्या अनुराग सोलंकीसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली मात्र हे लग्न जवळपास आठ महिनेच टिकलं. स्नेहा दुसऱ्यापतीपासून देखील विभक्त झाली.