“एजंट अग्नी मोठ्या पडद्यावर आग लावण्यासाठी येतेय”, कंगनाचा बहुप्रतिक्षित ‘धाकड’ च्या प्रदर्शनाची तारीख ठरली!

कंगनाचा बहुप्रतिक्षित ‘धाकड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

kangana-ranaut
(Photo-Instagram@kanganaranaut)

बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रनौत नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कंगना ही तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. कंगनाचा बहुप्रतिक्षित ‘धाकड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच कंगनाने धाकड चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने याबाबतची माहिती दिली आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने धाकड चित्रपटातील विविध फोटो कोलाज करुन पोस्ट केले आहेत. यातील प्रत्येक फोटोत कंगनाचा दमदार अंदाजात दिसत असून तिचा हा लूक थक्क करणार आहे. धाकड चित्रपटाचा कोलाज पोस्टर शेअर करत तिने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितले आहे. या फोटोच्या मध्यभागी कंगनाने धाकड असे लिहिले आहे. तर वरच्या बाजूला ८ एप्रिल २०२२ असे लिहिले आहे.

“ती भयंकर, धाडसी आणि निडर आहे. ‘एजंट अग्नी’ ही मोठ्या पडद्यावर आग लावण्यासाठी सज्ज आहे. तुमच्यासाठी अॅक्शन स्पाय थ्रिलर ‘धाकड’ तयार असून ८ एप्रिल २०२२ रोजी चित्रपटागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येईल,” अशी पोस्ट कंगनाने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

‘धाकड’ चित्रपट एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात कंगना अर्जुन रामपालसोबत झळकणार आहे. या चित्रपटात कंगना गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे. यात तिचे नाव ‘एजंट अग्नी’ असं आहे. या चित्रपटात भरपूर अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहे. त्यासोबतच हॉलिवूडमधील नावाजलेले अ‍ॅक्शन दिग्दर्शक हे सीन दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन रजनिश घई करत असून सोहेल मकलाई याची निर्मिती करणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kangana ranaut announces release date of dhaakad movie nrp

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या