अभिनेत्री कंगना रणौत सध्या बॉलिवूडमधील कलाकारांशी सातत्याने पंगा घेताना दिसत आहे. अलिकडेच सुशांत मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तिचे तापसी पन्नू आणि स्वरा भास्करसोबत खटके उडाले होते. त्यानंतर आता दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यासोबत तिचं ट्विटर वॉर रंगलं आहे. हाय प्रोफाईल पार्टींमधील ड्रग्स खूप महाग असतात त्यामुळे अनुभव सिन्हा यांना बोलावलं जात नाही, असा उपरोधीक टोला कंगनाने त्यांना लगावला आहे.
“जनता तुला माफ करणार नाही”; रियाला पाठिंबा देणाऱ्या तापसीवर अभिनेता संतापला
Anyone who says 90% of any industry is on drugs is on drugs. Even the drugs industry itself will have a much lower percentage.
Talking of low percentages…… ok let it be….
— Anubhav Sinha (@anubhavsinha) August 31, 2020
“या पैशांनी गरीबांची मदत करा”; नव्या कारमुळे बिग बींना केलं जातय ट्रोल
नेमकं प्रकरण काय आहे?
बॉलिवूडमधील ९९ टक्के मोठे कलाकार अंमली पदार्थांचं सेवन करतात असा खळबळजनक दावा कंगना रणौतने केला होता. तिचं हे वक्तव्य अनुभव सिन्हा यांना आवडलं नाही. “जी व्यक्ती इंडस्ट्रीवर आरोप करतेय तिच ड्रग्स घेत असेल.” अशा आशयाचं ट्विट करुन त्यांनी कंगनावर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्यानंतर त्यांच्या या ट्विटला कंगनाने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं.
Hey I specifically mentioned most high profile parties and inner circle of hugely successful stars, I have no doubt that people like you have never been invited to those parties cos these drugs are expensive, 99% superstars have been exposed to hard drugs and I guarantee this.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 2, 2020
“मी बॉलिवूडमधील हायप्रोफाईल पार्टींबद्दल बोलत होते. तिथे ९९ टक्के लोक ड्रग्स घेतात. या पार्टींचं आमंत्रण तुम्हाला दिलं जात नाही. कारण ड्रग्स खुप महाग असतात. तुम्हाला ते परवडणार नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने त्यांना उपरोधिक टोला लगावला आहे. कंगनाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
यापूर्वी काय म्हणाली होती कंगना रणौत?
आज तकला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “बॉलिवूडमधील जवळपास ९९ टक्के मोठे कलाकार अंमली पदार्थांचं सेवन करतात. या सर्व कलाकारांची चौकशी व्हायला हवी. ज्याप्रमाणे करोना चाचणी निगेटिव्ह आल्याशिवाय कुठलाही कलाकार शूटिंगला जाऊ शकत नाही. अगदी त्याच प्रमाणे अंमली पदार्थांची चाचणी निगेटिव्ह आल्याशिवाय कोणत्याच कलाकाराला काम करण्याची परवानगी मिळता कामा नये. यासाठी सरकारने नवे कायदे तयार करावे. व अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या कलाकारांवर कडक कारवाई करावी.”
