‘ट्विट’वॉर! मेरिल स्ट्रीपने किती राष्ट्रीय पुरस्कार मिळवले? कंगनाचं ट्विट नेटकरी म्हणाले…

कंगना का झाली पुन्हा ट्रोल? वाचा

अभिनेत्री कंगना रणौत आणि वाद असं समीकरणच तयार झाल्याचं दिसतंय. गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं चर्चेत असलेली कंगना आता तिच्याच एका ट्विटमुळे नेटकऱ्यांच्या रडारवर आली आहे. अभिनेत्री मेरील स्ट्रीप आणि अभिनेत्री गॅल गॅडोटशी स्वतःची तुलना केल्यामुळे नेटकऱ्यांनी कंगनाला लक्ष्य केलं आहे. कंगनानं तिला मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराचा उल्लेख करत एक प्रश्न केला होता. त्यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

१० फेब्रुवारी रोजी एक ट्विट करत कंगनाने स्वत: ची तुलना ऑस्कर विजेता अभिनेत्री मेरील स्ट्रीपशी केल्यानंतर सोशल मीडियावर ती प्रचंड ट्रोल झाली होती. त्यावर कंगनानं ट्रोलर्सला उत्तर दिलं होतं. “मला किती वेळा ऑस्कर मिळाला असा सवाल करणाऱ्यांनी सांगावं की मेरील स्ट्रीपला किती राष्ट्रीय आणि पद्म पुरस्कार मिळाले आहेत? पण याचं उत्तर एकाकडेही नाही. तुमच्या गुलाम मानसिकतेतून बाहेर या… हीच वेळ आहे, तुम्ही स्वतः आदर आणि स्वत:ची किंमत जाणून घेण्याची,” असं कंगनानं म्हटलं होतं.

या ट्विटवरून कंगना पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. एक नेटकरी म्हणाला, “मी तुला तीन गोष्टी सांगेल. मेरिल स्ट्रीपला ३ अकादमी आणि २१ नॉमिनेशन्स होते. कंगना शुन्य.”

दुसरा म्हणाला की, “राष्ट्रीय पुरस्कार हे फक्त भारतीय चित्रपटसृष्टीसाठी असतात. मेरील स्ट्रीप जोपर्यंत भारतीय सिनेसृष्टीत येत नाही तोपर्यंत तिला मिळणार नाही. ऑस्कर हा सगळ्यांसाठी असतो.”

आणखी वाचा- कंगनाने केली मेर‍िल स्ट्रीपबरोबर स्वत:ची तुलना; जाणून घ्या या ऑस्कर विजेत्या अभिनेत्रीविषयी

जणू अप्सराच! कोण आहे ‘Miss India 2020’ मानसा वाराणसी? बघा ग्लॅमरस Photos

तर तिसरा म्हणाला, “माझे इतिहासाचे शिक्षक नेहमी म्हणायचे, अर्धवट ज्ञान हे कोणतंही ज्ञान नसण्यापेक्षा वाईट आहे. मॅडम तुम्ही खरंच बावळट आहात. ऑस्कर हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जगभरातील निवडक लोकांना त्यांच्या चित्रपसृष्टीतील कामगिरीसाठी दिला जातो. जगाचा विचार करण्याची गरज नाही, इथेच तुझ्यापेक्षा जास्त चांगल्या अभिनेत्री आहेत.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kangana ranaut got troll for asking how many national or padmashree awards merly streep got dcp 98 avb