अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती मुंबई प्रकरणामुळे चर्चेत आहे. अलिकडेच केलेल्या एका ट्विटमध्ये तिने मुंबई ही तिला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटू लागली आहे, असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. या ट्विटमुळे कंगनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान बॉलिवूड दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी देखील तिच्यावर निशाणा साधला आहे.

अवश्य पाहा – नरेंद्र मोदींचं अकाउंट हॅक करणारा ‘जॉन विक’ कोण आहे?

“जर मुंबईला पीओके म्हटलं तर दिल्ली आणि उत्तर प्रदेशला ग्वांतानामो बे म्हटलं पाहिजे. मुंबई हे भारतातील सर्वात सुंदर आणि सुरक्षित शहर आहे. माझं मुंबईवर खुप प्रेम आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन राहुल ढोलकिया आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अवश्य पाहा – ड्रग्स प्रकरणात क्राईम ब्रँचने अभिनेत्रीला बजावलं समन्स

यापूर्वी कंगनाने काय म्हटलं होतं?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका कंगनाने ट्विटरवरुन केली. ट्विटमध्ये तिने लिहिलं आहे की, “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि मी पुन्हा मुंबईत परत येऊ नये असं म्हटलं. या आधी मुंबईच्या रस्त्यांवर आझादीच्या मागण्या करणारे ग्रॅफिटी दिसत होते आणि आता तर मला उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. ही मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?”.