scorecardresearch

कंगना रणौतचा प्रसिद्ध फॅशन डिझायनरवर आरोप; म्हणाली…

कंगनाने ट्विट करुन केले आरोप

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगनाने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर निशाणा साधला आहे. ‘सुशांतने आत्महत्या केली नसून त्याचा खून झाला आहे’, असं धक्कादायक विधान तिने केलं. त्यानंतर आता तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर अनाइता श्रॉफ अदजानिया हिच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

माझ्या परवानगीशिवाय माझे जुने फोटो अनाइताने स्वत:च्या प्रसिद्धीसाठी वापरल्याचा आरोप कंगनाने केला आहे. कंगनाने ट्विट करुन हे आरोप केले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियाव कंगनाचं हे ट्विट चांगलंच चर्चिलं जात आहे. अनाइता वोग इंडियाची डायरेक्टर असून ती चित्रपट दिग्दर्शक करण जोहरची जवळची मैत्रीण आहे.

“अनाइता श्रॉफ अदजानिया स्वत:च्या प्रसिद्धीसाठी माझे जुने फोटो आणि व्हिडीओ सतत वापरत आहे. तसंच माझे फोटो आणि व्हिडीओ वापरण्यापूर्वी तिने माझी परवानगीदेखील घेतलेली नाही”, असं ट्विट कंगनाने  केलं आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगनाने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर पुन्हा एकदा टीकास्त्र डागलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिचीच चर्चा आहे. कंगना कायम तिची मत रोखठोक पद्धतीने आणि बेधडकपणे मांडत असते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kangana ranaut now targets top stylist anaitha adajania accused her for this ssj