बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायच चर्चेत असते. ती सामाजिक विषयावर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. तिची प्रत्येक पोस्ट ही चर्चेचा विषय ठरते. कंगना एक दिग्दर्शिका तसेच निर्माती देखील आहे. आता ती डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे. या शोचा टीझर प्रदर्शित झाला असून त्यामध्ये कंगना ‘माझ्या कैदेत असणार १६ सेलिब्रिटी’ असे बोलताना दिसत आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘लॉक अप’ या तिच्या आगामी रिअॅलिटी शोचा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमोमध्ये ती, ‘या देशात दोन प्रकारचे लोक आहेत. एक ज्यांना मी आवडते आणि दुसरे बी-ग्रेडचे स्ट्रगरलर्स जे माझ्याविषयी चुकीचे बोलून चर्चेत असतात. ज्यांनी माझा आवाज दाबण्यासाठी माझ्या विरोधात तक्रार केली आणि घराणेशाहीचा वापर केला. आता माझी वेळ आली आहे. मी एक मोठा शो घेऊन येत आहे. माझे जेल आणि माझे नियम. माझ्या कैदेत असणार १६ सेलिब्रिटी’ असे बोलताना दिसत आहे.

What Mahua Moitra Said?
“S*X…” तुम्हाला उर्जा कुठून मिळते? महुआ मोइत्रांच्या कथित उत्तराचा व्हिडीओ व्हायरल
IPL 2024 Match Ticket Price Updates in Marathi
IPL 2024 : गुणतालिकेत नीचांकी, तिकीटं उच्चांकी; आरसीबीच्या मॅचच्या तिकिटाला मात्र ५० हजारांचा भाव
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

कंगनाच्या ‘लॉकअप’ या शोमध्ये ती टीव्ही क्वीन एकता कपूरसोबत दिसणार आहे. या शोमध्ये १६ स्पर्धक हे ७२ दिवसांसाठी लॉकअपमध्ये बंद राहणार आहेत. हा शो २७ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या शो विषयी बोलताना कंगना म्हणाली होती की, ‘मी गेल्या काही दिवसांपासून ओटीटीसाठी काही करावे असा विचार करत होते. पण या शो विषयी नेमकं काय करावे हे मी काही ठरवले नव्हते. जेव्हा मला एकता कपूरचा फोन आला आणि तिने मला याबाबत माहिती दिली तेव्हा मला तो प्रचंड आवडला. त्यानंतर तो मी करण्याचा निर्णय घेतला.’