विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नावर कंगनाची प्रतिक्रिया, म्हणाली…

कगंनाची ही पोस्ट सध्या चर्चेत असून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Kangana Ranaut, Kangana Ranaut Reaction, Katrina Kaif, Vicky Kaushal, Katrina Vicky Age Gap, Vicky Kaushal Age, Katrina Kaif Age,

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे त्यांच्या शाही लग्नासाठी राजस्थानला पोहोचले आहेत. या लग्न सोहळ्याला कोणते कलाकार हजर राहणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. करण जोहर, नेहा धूपिया आणि इतर काही कलाकारांचा या यादीमध्ये समावेश आहे. सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून विकी आणि कतरिनाला शुभेच्छा देताना दिसत आहेत. दरम्यान, बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

कंगना ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत कोणत्या ना कोणत्या विषयावर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. आता कंगनाने विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या मधील वयाच्या अंतारावर वक्तव्य केले आहे.
आणखी वाचा : …तर लग्नाच्या शूटींगमधूनच विकी-कतरिना करणार १०० कोटी रुपयांची कमाई?

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर पोस्ट शेअर करत विकी एक माणूस म्हणून चांगला आहे अस म्हटले आहे. ‘मी लहानपणी यशस्वी पुरुषांनी त्यांच्या पेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या मुलींशी लग्न केल्याच्या कथा ऐकल्या आहेत. एखादी महिला तिच्या करिअरमध्ये पतीपेक्षा जास्त यशस्वी असेल ते एक संकट मानले जाते. इतकच काय तर एका विशिष्ठ वयानंतर आपल्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्या पुरुषाशी लग्न करणे असंभव होते. भारतीय चित्रपटसृष्टीमधील अतिशय सुंदर आणि यशस्वी महिला या सर्व गोष्टी विसरुन लग्न करत आहे हे पाहताना आनंद होत आहे’ या आशयाची पोस्ट कंगनाने केली आहे.

दरम्यान, विकी कौशल अभिनेत्री कतरिना कैफसोबत ९ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील ‘सिक्स सेन्स फोर्ट’ या हॉटेलमध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडणार असून, त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या शाही विवाहाच्या विधींना सात डिसेंबरपासून संगीत सोहळ्याने सुरुवात झाली आणि आज या जोडप्याचा मेहंदी सोहळा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kangana ranaut reaction on katrina kaif and vicky kaushal marraiag avb

ताज्या बातम्या