अभिनेत्री कंगना रणौत वादग्रस्त विधानांमुळे टॉक ऑफ द टाऊन ठरते. सिनेसृष्टीमधील एखादा वाद कंगना शिवाय अपूर्णच असतो असं म्हणायला हरकत नाही. बॉलिवूडमधील असे अनेक मुद्दे आहेत त्यावर कंगना खुलेपणाने आपलं मत मांडताना दिसते. त्यातीलच एक मुद्दा म्हणजे कलाकार मंडळी प्रत्येक चित्रपटांसाठी घेत असलेलं मानधन. अजूनही मानधनाबाबत बॉलिवूडमध्ये समानता नाही. अभिनेत्याला अधिक मानधन तर अभिनेत्रीला त्यापेक्षा कमी मानधन एका चित्रपटासाठी दिलं जातं. पण कंगना मात्र याला अपवाद आहे. तिने आता याच मुद्द्यावर आपलं मत मांडलं आहे.
‘धाकड’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान कंगनाला बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींना अभिनेत्यांपेक्षा कमी मानधन मिळतं याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा कंगना हसत म्हणाली. “माझ्या निर्मात्यासमोर असा प्रश्न विचारु नका. असं बोलू नका की अभिनेत्रीला अभिनेत्यापेक्षा कमी पैसे मिळतात. माझ्या निर्मात्यांना असं वाटेल की मी इतर अभिनेत्यांसारखं मानधन घेते.”




आणखी वाचा – सैफ-करीनाचा लाडका तैमूर घेतोय तायक्वांदोचं प्रशिक्षण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
कंगना पुढे बोलताना म्हणाली की, “मला इतर अभिनेत्रींचं माहित नाही पण मी अंडरपेड अभिनेत्री नाही आहे. चित्रपटांसाठी जेवढं अभिनेता मानधन घेतो तितकंच मानधन मी देखील घेते. अभिनेत्याप्रमाणेच मानधन घेण्यास मी पात्र आहे. पण हे सगळं मला एका रात्रीत मिळालेलं नाही. इथवर पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे.” कंगना महिला प्रधान चित्रपट करण्याकडे अधिक भर देते.
आणखी वाचा – वयाच्या ६०व्या वर्षी राम गोपाल वर्मांना असं वागणं शोभतं का? अभिनेत्रीसोबतचे विचित्र फोटो, व्हिडीओ VIRAL
कंगनाचा ‘धाकड’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती या चित्रपटामध्ये बरेच अॅक्शन सीन्स करताना दिसेल. यासाठी तिने कोट्यावधी रुपयांचं मानधन घेतलं असल्याचीही चर्चा आहे. फक्त कंगनाच नव्हे तर दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा यांसारख्या अभिनेत्री देखील अभिनेत्यांसारखंच मानधन घेतात.