बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर नेहमीच आपलं मत मांडताना दिसते. आपल्या बिनधास्त स्वभावामुळे कंगना नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. अनेकदा तिला यामुळे नेटकऱ्यांच्या टीकेलाही समोरं जावं लागतं. आताही कंगना सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

कंगना रणौतनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही मुख्यमंत्र्यांच्या घरांचे फोटो शेअर केले आहेत. कंगनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. कंगनानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये मायावती, अखिलेश यादव आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरांचं कोलाज आहे. ज्यात तीनही घरांतील फरक स्पष्ट दिसून येत आहे. कंगनानं शेअर केलेला हा फोटो या फरकामुळेच सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे.

devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”
nashik, Fraud Case Registered Against Panjarpol , Nashik Panjarpol Sanstha Managers, Forged Letter, Allegedly Signed by Chief Minister, land acquisition panjrapole nashik, panjrapole nashik fraud, forged letter cm eknath shinde,
भूसंपादन प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे बनावटपत्र, श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
Delhi CM and AAP national convenor Arvind Kejriwal with Amit Palekar
दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात ईडीच्या रडारवर गोव्यातील आप नेते; कोण आहेत अमित पालेकर?
BJP leader Shobha Karandlaje election commission
बॉम्बस्फोटाप्रकरणी वादग्रस्त विधानावर कारवाई, कोण आहेत ‘या’ भाजपाच्या खासदार?

कंगना रणौत नेहमीच भाजपला समर्थन देताना दिसते. ती अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना समर्थन देतानाच त्यांच्या कामाचं कौतुकही करताना दिसते. आताही तिनं हा फोटो शेअर करत योगी आदित्यनाथ यांना समर्थन दिलं आहे. कंगनानं शेअर केलेल्या या फोटोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेकांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअरही केला आहे.

दरम्यान ट्विटर अकाउंटवर बंदी आणल्यानंतर कंगना रणौत इन्स्टाग्रामवर बरीच सक्रिय असलेली दिसून येते. अनेकदा ती इन्स्टाग्रामवरून राजकीय मुद्द्यांवरही भाष्य करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशला गेलेल्या कंगनानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेटही घेतली होती.