scorecardresearch

So Hot! म्हणत कंगनाने शेअर केला नवाजुद्दीनचा खास लूकमधील ‘तो’ फोटो

कंगनाने आगामी चित्रपटातील अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे एका खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अनेकदा विविध मुद्द्यावर मत व्यक्त केल्यामुळे तिला वादालाही सामोरे जावे लागते. कंगना ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच कंगनाने इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी चित्रपटातील अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे एका खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

कंगनाने काही तासांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आगामी टीकू वेड्स शेरु या चित्रपटातील दोन फोटो पोस्ट केले आहेत. हे दोन्हीही फोटो अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे आहेत. यात तो एका वेगळ्याच लूकमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोत नवाज हा एका स्त्रीच्या वेषात दिसत असून त्याने लेहंगा परिधान केला आहे.

कंगनाने शेअर केलेल्या एका फोटोत नवाज लेहंगा घालून मुजरा करताना दिसत आहे. सो हॉट! असे म्हणत कंगनाने हा फोटो शेअर केला आहे. तर दुसरा याच लूकमधील फोटो शेअर करत तिने त्यालाही हटके कॅप्शन दिले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही फोटोत तिने नवाजलाही टॅग केले आहे. त्यासोबत तिने तिच्या आगामी टीकू वेड्स शेरु या चित्रपटाचे नावही हॅशटॅग करत वापरले आहे.

दरम्यान कंगनाने शेअर केलेला नवाजचा हा फोटो आगामी ‘टीकू वेड्स शेरू’ या चित्रपटाच्या सेटवरून घेण्यात आला आहे. या चित्रपटाद्वारे कंगना निर्मिती क्षेत्रात तिचे नशीब आजमावताना पाहायला मिळणार आहे.

“जरी मी बिग बॉस जिंकला नसता तरी…”, विजेतेपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना तेजस्वी प्रकाशने दिले सडेतोड उत्तर

कंगना निर्मिती करत असलेल्या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर हे कलाकार स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साई कबीर यांनी केले आहे. तर कंगनाच्या प्रॉडक्शन हाऊस ‘मणिकर्णिका फिल्म्स’ अंतर्गत याची निर्मिती केली जात आहे. हा तिचा पहिला डिजीटल चित्रपट असणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kangana ranaut shares nawazuddin siddiqui photos in a female look from tiku weds sheru nrp