वरुण धवनचा ‘डान्स’ कंगनावर पडला भारी

वरुण धवनचा ‘स्ट्रीट डान्स’ कंगनाच्या कबड्डीवर पडला भारी

गेल्या काही वर्षात एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या कमालीची वाढली आहे. या आठवड्यातही एकाच दिवशी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. पहिला चित्रपट वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि प्रभू देवाच्या जबरदस्त डान्सने भरलेला ‘स्ट्रीट डान्सर’ होता. तर दुसरा कंगना रनौतचा कबड्डी खेळावर आधारित असलेला ‘पंगा’ हा चित्रपट होता. मात्र देशभरातील प्रेक्षकांनी आपला कौल ‘स्ट्रीट डान्सर’च्या दिशेने दिला आहे.

अवश्य वाचा – ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर

अवश्य वाचा – “कुछ लोग मुझे गिराने में कई बार गिरे…” – अनुपम खेर

‘स्ट्रीट डान्सर’ या थ्रीडी चित्रपटाने पहिल्याच दिवशी १० कोटी २६ लाखांची दणदणीत कमाई केली. तर दुसरीकडे पंगा हा चित्रपट मात्र २ कोटी ७० लाख रुपये इतकीच कमाई करु शकला.

अवश्य वाचा – JNU प्रकरणातील आरोपींना कधी पकडणार; अनुराग कश्यप संतापला

‘पंगा’ या चित्रपटाला ‘स्ट्रीट डान्सर’च्या तुलनेत समिक्षकांनी जास्त चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘पंगा’ची पटकथा त्याचे चित्रीकरण आणि कंगना रनौतचा अभिनय समिक्षकांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. मात्र प्रेक्षकांचा कल ‘स्ट्रीट डान्सर’च्या दिशेने आहे. कारण या चित्रपटात जबरदस्त डान्स आणि ग्लॅमरचा तडका आहे. तसेच प्रेक्षकांना तीन तास खुर्चीवर खिळवून ठेवणारी ‘मुकाबला’ सारखी गाणी देखील आहेत. त्यामुळे देशातील तरुणाईला ‘पंगा’सारख्या नाट्यमय चित्रपटापेक्षा स्ट्रीट डान्सरसारखा ग्लॅमरच्या तडक्याने भरलेला मसालापट जास्त आवडताना दिसत आहे. परिणामी तिकीटबारीवर वरुण धवन आणि श्रद्धा कपूर कंगना रनौतवर पूर्णपणे भारी पडताना दिसत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kangana ranaut street dancer 3d box office collection mppg

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या