खळबळजनक वक्तव्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलंय. सतत वादग्रस्त वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण केल्याचं कारण देत ट्विटरने ही कारवाई केली आहे. असं असलं तर कंगना काही थांबलेली नाही. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून ती वादग्रस्त वक्तव्य करत असते. कंगना तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम ट्रोल होत आली आहे.

पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केलंय. यंदा मात्र कोणतही वादग्रस्त वक्तव्य केलेलं नसतानाही ती ट्रोल झालीय. कंगनाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्य़ा. रॉयल लूकमधील फोटो शेअर करत तिने ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.

एक ट्रोलर म्हणाला, “या ईदच्या निमित्ताने तू शपथ घे की तू एक माणूस बनशील.”तर दुसरा म्हणाला, ” मला आश्चर्य वाटतंय काल पर्यंत तू इस्लामोफोबिया आणि खोटी, निराधार माहिती पसरवत होतीस. काहीही माहिती नसताना तू एका पक्षावर आरोप केलेस आणि दुसऱ्या दिवशी तू ईदच्या शुभेच्छा देत आहेस.” असं म्हणत युजरने संताप व्यक्त केलाय.

तर एका नेटकऱ्याने कंगना दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हंटलं आहे. ” हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भेद का निर्माण करतेस ? सर्वात पहिले आणि महत्वाचं म्हणजे आपण सर्व माणसं आहोत. हे लक्षाच ठेव आणि मग तुझं मत दे. कृपा करून तुझी मानसिकता बदल.” असं म्हणत युजरने संताप व्य़क्त केलाय.

kangna-ranaut-troll
(photo-facebook/screenshot)

वाचा: ‘यामुळे’ जॉन अब्राहमला १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली!

इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमधील वादातही कंगनाने उडी घेतली होती. ” कट्टरपंथी इस्लामी दहशतवादाच्या या युद्धात भारत इस्लायलसोबत आहे. आपल्या राष्ट्राचं दहशतवादापासून रक्षण करणं प्रत्येक राष्ट्राचा अधिकार आहे आणि भारत इस्रायलसोबत आहे.” या पोस्टनंतरही कंगना ट्रोल झाली होती. “कंगना भारताची परराष्ट्र मंत्रा आहे का?” अशा आशयाच्या कमेंट करत कंगनाला ट्रोल करण्यात आलं होतं.