scorecardresearch

कंगना रणौत करणार सुशांत सिंग राजपूतच्या एक्सचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

लवकरच ती आता ६० एमएमच्या पडद्यावर दिसणार आहे

kangana ranaut
कंगना रणौत
प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतची पूर्वाश्रमीची प्रेयसी अंकिता लोखंडेच्या बॉलिवूड पदार्पणावर अनेक चर्चा रंगल्या होत्या. ‘पवित्र रिश्ता’ फेम अंकिता आता आपल्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. ‘बॉलिवूड लाइफ’ या ऑनलाइन पोर्टलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कंगना रणौत आपल्या आगामी ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ या सिनेमातून तिला लॉन्च करणार आहे. स्वतः अंकितानेही या गोष्टीला दुजोरा दिला असून लवकरच ती आता ६० एमएमच्या पडद्यावर दिसणार आहे.

कसं जिंकायचं हे तुम्ही दाखवून दिलं, महिला क्रिकेटरांवर सोनाक्षीची कौतुकाची थाप

अंकिता या सिनेमात झलकारी बाई ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. आपल्या व्यक्तिरेखेबद्दल ‘मुंबई मिरर’शी बोलताना अंकिता म्हणाली की, ‘मी याआधी झलकारी बाईबद्दल कधीही ऐकले नव्हते. अनेक लोकांना या व्यक्तिरेखेबद्दल माहितही नसेल. पण झलकारी बाई या तेव्हाच्या महान व्यक्तींपैकी एक होत्या. जगाला अशा व्यक्तीची ओळख माझ्या भूमिकेतून मिळणार यामुळेच मी आनंदीत झाले आहे.’ झलकारी नेहमीच राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत उभ्या असायच्या. त्या लक्ष्मीबाई यांच्या सैन्यातील महत्त्वपूर्ण व्यक्ती होत्या. त्यांच्यासोबत सल्ला घेऊनच अनेक गोष्टी राणी लक्ष्मीबाई करायच्या.

फक्त एवढंच नाही तर या शूर महिलेने इंग्रजी सेनेद्वारे करण्यात येणाऱ्या छळात स्वतःची ओळख राणी लक्ष्मीबाई अशी करुन देत आपले प्राण पणाला लावले होते. या सिनेमात तुम्हाला सर्वच अभिनेत्री या लढताना, तलवारबाजी करताना आणि घोडेस्वारी करताना दिसणार आहेत. या सिनेमाची संहिता ‘बाहुबली’चे लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी लिहीली आहे. तर या सिनेमाच्या मुख्य भूमिकेत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना रणौत दिसणार आहे. ऑगस्ट महिन्यात या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. याआधीही अंकिता, संजय दत्त याच्या ‘मलंग’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करेल अशी चर्चा होती. पण आता या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.

होणाऱ्या नवऱ्याने दिलेली अंगठी अनुष्काने हरवली?

‘मिड-डे’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अंकिताने संजयचा ‘मलंग’ सिनेमाही स्वीकारला आहे. अंकिताला अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये पदार्पण करायचे होते. असे म्हटले जाते की, तिने शाहरुख खानच्या ‘हॅपी न्यू इयर’ आणि संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या दोन्ही सिनेमांसाठी प्रयत्न केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kangana ranaut will launch ankita lokhande in her upcoming movie manikarnika the queen of jhansi

ताज्या बातम्या