scorecardresearch

‘मी तिचे चित्रपट प्रमोट करायला बसलेले नाही’ दीपिकाबद्दलचा ‘तो’ प्रश्न ऐकून कंगना संतापली

पत्रकारानं दीपिकाबाबत विचारलेल्या प्रश्नावर कंगनाची प्रतिक्रिया पाहून सर्वच हैराण झाले आहेत.

‘मी तिचे चित्रपट प्रमोट करायला बसलेले नाही’ दीपिकाबद्दलचा ‘तो’ प्रश्न ऐकून कंगना संतापली
कंगनाला या पत्रकार परिषदेत दीपिका पदुकोणबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

कंगना रणौतनं गुरुवारी एकता कपूरचा आगामी रिअलिटी शो ‘लॉकअप’च्या प्रमोशनसाठी हजेरी लावली. कंगना या शोची होस्ट असणार आहे. पण यावेळी पत्रकार परिषदेत असं काही घडलं की सर्वच हैराण झाले. कंगनाला या पत्रकार परिषदेत दीपिका पदुकोणबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावर तिने असं काही उत्तर दिलं की तिथे उपस्थित असलेले लोक पाहतच राहिले.

प्रमोशन सोहळ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कंगनाला, ‘दीपिका पदुकोण सारख्या महिलेला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केलं जात आहे. याचा महिला सशक्तीकरणावर काय प्रभाव पडतो.’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना कंगना म्हणाली, ‘जे लोक स्वतःसाठी बोलायला आवाज उठवू शकत नाहीत त्यांच्यासाठी बोलायला मी इथे आलेले आहे. मी तिच्यासाठी बोलणार नाही.’

कंगना पुढे म्हणाली, ‘दीपिकाकडे स्वतःचा आवाज आहे, एक प्लॅटफॉर्म आहे आणि तिचा चाहतावर्गही बराच मोठा आहे. ती स्वतःच स्वतःचा बचाव करू शकते, बोलू शकते. मी काही इथे तिच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आलेले नाही. तुम्ही बसू शकता.’ कंगनाच्या या प्रतिक्रियेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोण तिचा आगामी चित्रपट ‘गहराइयां’च्या प्रमोशनसाठी परिधान केलेल्या शॉर्ट ड्रेसमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं दीपिकाला ट्रोल करताना, ‘बॉलीवूडचा न्यूटन नियम, जसजशी ‘गहराइयां’च्या प्रमोशनची तारीख जवळ येत जाईल तसे कपडे छोटे होत जातील.’ अशी कमेंट केली होती. त्याला दिपीकानं, ‘वैज्ञानिकांच्या मानण्याप्रमाणे हे जग, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन यांनी मिळून तयार झालं आहे पण ते मूर्खांबद्दल सांगायलाच विसरले.’ असं उत्तर देत त्याची बोलती बंद केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या