scorecardresearch

Premium

प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारने फुटपाथवरून चालणाऱ्या जोडप्याला दिली धडक; महिलेचा मृत्यू, पतीची प्रकृती चिंताजनक

बंगळुरूमध्ये अभिनेत्याच्या कारने फुटपाथवरून चालणाऱ्या जोडप्याला दिली धडक, महिलेचा अपघातात मृत्यू

kannada actor Nagabhushana rams car into couple in bengaluru
अभिनेत्याच्या कारने दिली जोडप्याला धडक

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कन्नड अभिनेता नागभूषणच्या कारने बंगळूरूमध्ये फुटपाथवरून चालणाऱ्या जोडप्याला शनिवारी रात्री धडक दिली. या अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झाला असून, तिच्या पतीची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. या अपघातानंतर पोलिसांनी अभिनेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : प्रियांका चोप्राच्या आईने शेअर केला परिणीती-राघवच्या लग्नातील Unseen फोटो, म्हणाल्या…

girish kuber chat with actor pankaj tripathi in loksatta gappa event
सुमारांच्या सद्दीमुळे साधारण कलाकारही इथे थोर..
9th edition, World of Concrete India (WIKI), october, mumbai, concrete industry,
बांधकाम उद्योगाला आकार देण्यात ‘एआय’च्या भूमिकेवर श्वेतपत्रिका, ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या ‘काँक्रीट शो’मध्ये अनावरण
actress cheated online in pune, pune actress cheated, actress cheated with the lure of webseries
वेबसिरीजमध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने अभिनेत्रीची ऑनलाइन फसवणूक
onkar bhojne
“मी त्याचा फॅन, त्याला भेटण्यासाठी…” ओंकार भोजनेने सांगितला प्रसिद्ध अभिनेत्याबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा

अभिनेता नागभूषणवर या प्रकरणी बंगळुरूमधील कुमारस्वामी ट्राफिक पोलीस स्थानकात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. शनिवारी रात्री ९.४५ च्या सुमारास ही घटना घडली. संबंधित जोडपं वसंतपुरा मेन रोडच्या फुटपाथवरून चालत होतं. त्यावेळी नागभूषणच्या कारने त्यांना धडक दिली. जोडप्याला धडक दिल्यावर पुढे जाऊन अभिनेत्याची कार विजेच्या खांबाला धडकली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचा : Video “कधीही विसरता न येणारा प्रवास”; रिंकू राजगुरुने शेअर केला केदारनाथ ट्रीपचा अनसिन व्हिडिओ, म्हणाली…

अभिनेता नागभूषण उत्तराहल्लीहून कोननकुंटेकडे जात असताना हा अपघात झाला. अपघातामध्ये ४८ वर्षीय महिलेचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. तसेच तिच्या पतीच्या दोन्ही पायांना, डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर नागभूषण स्वत: जखमी दाम्पत्याला रुग्णालयात घेऊन गेला होता.

हेही वाचा : शिवानी रांगोळेच्या ऑनस्क्रीन लग्नाबाबत विराजस कुलकर्णीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत म्हणाला…

दरम्यान, नागभूषणने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘संकष्ट करा गणपती’ या चित्रपटामधून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्याचा ‘तगारू पल्या’ हा बहुचर्चित चित्रपट नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kannada actor nagabhushana rams car into couple in bengaluru woman dies sva 00

First published on: 01-10-2023 at 17:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×