scorecardresearch

प्लॅस्टिक सर्जरीमुळे अभिनेत्रीचं वयाच्या २१ व्या वर्षी निधन

प्लॅस्टिक सर्जरीमुळे कन्नड अभिनेत्रीचं वयाच्या २१ व्या निधन झालं आहे.

chethana raj, kannada tv actress, chethana raj dies, fat free surgery, chethana raj dies after fat free surgery, चेतना राज, फॅट फ्री सर्जरी, चेतना राज निधन, कन्नड अभिनेत्री
कन्नड टीव्ही अभिनेत्री चेतना राजचं वयाच्या २१ व्या वर्षी निधन झालं आहे.

कन्नड टीव्ही अभिनेत्री चेतना राजचं वयाच्या २१ व्या वर्षी निधन झालं आहे. चेतनानं बंगळुरूच्या एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार तिचं निधन प्लॅस्टिक सर्जरीमुळे झाल्याचं बोललं जात आहे. तिला फॅट फ्री सर्जरीसाठी बंगळुरूच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिची तब्येत अचानक बिघडली. तिच्या फुफ्फुसात पाणी जमा झाल्यानं तिचं निधन झाल्याचं बोललं जात आहे.

काही मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्रीनं या सर्जरीबाबत तिच्या आई-वडिलांना कोणतीही कल्पना दिली नव्हती. ती तिच्या मैत्रिणींसोबत रुग्णालयात गेली होती. सर्जरी झाल्यानंतर संध्याकाळी तिला त्रास जाणवू लागला. तिच्या फुफ्फुसांमध्ये पाणी जमा होऊ लागलं आणि त्यानंतर काही तासांमध्येच तिचा मृत्यू झाला. या घटनेनं तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

आणखी वाचा- “शरद पवार यांच्याबद्दल असं बोलताना…” केतकी चितळेवर संतापली मानसी नाईक

दरम्यान चेतनाच्या आई- वडिलांना या घटनेसाठी डॉक्टरांना जबाबदार धरलं आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना आपली मुलगी गमवावी लागल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अभिनेत्रीच्या वडिलांनी रुग्णालय व्यवस्थापनाच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. चेतना कन्नड टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. ‘गीता’ आणि ‘दोरेसानी’ तिच्या लोकप्रिय टीव्ही मालिकांपैकी दोन मालिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kannada actress chethana raj dies after fat free surgery mrj