काँग्रेस नेते राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावाची मानहानी केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली. तेव्हापासून राहुल गांधी चर्चेत आहेत. आत प्रसिद्ध अभिनेत्रीने राहुल गांधींबाबत वक्तव्य केलं आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री व माजी खासदार दिव्या स्पंदनाने राहुल गांधींनी तिचा जीव वाचवल्याचं म्हटलं आहे. दिव्या स्पंदनाने नुकतीच कन्नड टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत तिने राहुल गांधींबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. दिव्या म्हणाली, “वडिलांच्या निधनांनतर जवळपास दोन आठवड्यांनी मी संसदेत गेले होते. मला काहीच माहीत नव्हतं आणि काही कळतही नव्हतं. संसदेचं काम कसं चालतं, याबाबतही मला माहिती नव्हती.”
हेही वाचा>> लेकीच्या आत्महत्येनंतर आकांक्षा दुबेच्या आईची मुख्यमंत्र्यांना विनंती, म्हणाली “योगी सरकार…”
हेही वाचा>> राघव चड्ढा यांनी शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओला परिणीती चोप्राने केलं लाइक; नेटकरी म्हणाले “लग्नाची तारीख…”
“वडिलांच्या निधनानंतर मला प्रचंड भावनिक त्रास झाला. आत्महत्या करण्याचे विचार माझ्या मनात येत होते. मला कित्येकांनी समजावलं. निवडणुकीतही माझी हार झाली. त्यावेळी राहुल गांधींनी माझी साथ दिली. आत्महत्येचे विचार दूर करण्यास त्यांनी मदत केली. माझ्या आयुष्यात तीन लोकांना महत्त्वाचं स्थान आहे. माझी आई, माझे वडील आणि राहुल गांधी,
दिव्या स्पंदना उत्तम अभिनेत्री असून ती राजकारणातही सक्रिय आहे. २०१२ साली तिने युवा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१३ साली कर्नाटकातील मांड्या मतदारसंघातून ती खासदार म्हणून निवडून आली होती. तिने काँग्रेस
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kannanda actress and ex mp divya spandana revealed that congress leader rahul gandhi help her for suicidal thoughts kak