लग्नानंतर वर्षभरातच कपिल शर्मा होणार बाबा

कपिल आणि गिन्नीने जवळपास पाच महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधली.

kapil sharma and his wife
कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी छत्रथ

कॉमेडिनय कपिल शर्मासाठी यंदाचं वर्ष आनंदाच्या बातम्यांनी परिपूर्ण ठरत आहे. ‘द कपिल शर्मा शो’ला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असतानाच आता आणखी एक आनंदाची बातमी आहे. कपिलच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. कपिलची पत्नी गिन्नी छत्रथ गरोदर असल्याचं वृत्त ‘मुंबई मिरर’ने दिलं आहे.

कपिल आणि गिन्नीने जवळपास पाच महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधली. कॉलेजमध्ये असल्यापासून ते रिलेशनशिपमध्ये होते. गिन्नी गरोदर असल्याचं कळताच कपिलची आईसुद्धा मुंबईत त्यांच्यासोबत राहायला आली आहे. गिन्नीसोबत अधिक वेळ घालवता यावा म्हणून कपिलने त्याच्या शूटचं वेळापत्रक त्याप्रकारे आखून घेतलं आहे. येत्या डिसेंबर महिन्यात कपिलच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. त्यामुळे लग्नानंतर वर्षभरातच कपिल शर्मा बाबा होणार आहे.

आपल्या विनोदाने टेलिव्हिजन विश्व गाजवणारा विनोदवीर आणि अभिनेता कपिल शर्मा बऱ्याच काळापासून त्याच्या लव्ह लाइफबद्दल गुप्तता बाळगून होता. २०१७ मध्ये त्याने गिन्नीच्या फोटोसह एक खास ट्विट करत रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं. पंजाब येथील जलंधरमध्ये महाविद्यालयीन प्रशिक्षण घेत असताना या दोघांची भेट झाली. गिन्नी आणि कपिल ‘हस बलिये’ कार्यक्रमात एकत्र दिसले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. या कार्यक्रमात विजेतेपद त्यांना मिळाले नाही. मात्र, त्यांच्या कामाची तेव्हा बरीच प्रशंसा झाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kapil sharma and ginni chatrath to embrace parenthood

ताज्या बातम्या