‘या’ कारणासाठी कपिल शर्माला बंद करावा लागला होता शो, केला ‘त्या’ गोष्टीचा खुलासा

या वर्षाच्या सुरुवातीला कपिल शर्माचा शो बंद झाला होता. त्यानंतर पुन्हा नवा सिझन सुरु करण्यात आला.

kapil-sharma-
(File Photo)

कॉमेडीन कपिल शर्माने आजवर आपल्या विनोदाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. नुकताच कपिलचा एक नवा व्हि़डीओ समोर आलाय. या व्हिडीओत कपिल त्याच्या चाहत्याचं मनोरंजन करत नसून त्याने एक किस्सा शेअर केलाय. कपिलने त्याला सामना करावा लागलेल्या त्याच्या आरोग्याशी निगडीत एक गोष्ट शेअर केलीय.

या व्हिडीओत कपिलने त्याला ‘द कपिल शर्मा शो’ का बंद करावा लागला या मागचं कारण सांगितलं आहे. पाठीच्या दुखण्यामुळे कपिलला खूप त्रास आणि वेदना सहन कराव्या लागत असल्याने त्याने शो बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या गोष्टीचा त्याने नुकताच खुलासा केलाय. कपिल शर्माने सांगितल “२०१५ सालामध्ये हे पहिल्यांदा झालं होतं. तेव्हा मी अमेरिकेत होतो आणि मला फारशी कल्पना नव्हती. मला दुखत होतं म्हणून मी डॉक्टरांकडे गेलो त्यांनी काही औषधं दिली. मला तात्पुरती विश्रांती मिळाली. मात्र मी पूर्ण बरा झालो नव्हतो. या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात पुन्हा त्रास होवू लागला.” असं कपिल म्हणाला.

“बायो बबल लाइफमधील प्रेम”; अनुष्का शर्माने शेअर केले विराटचे खास फोटो

१६ ऑक्टोबरला वर्ल्ड स्पाइन डेच्या निमित्ताने कपिलने या गोष्टीचा खुलासा केला. तो म्हणाला, “स्पाईन म्हणजेच मणका हा महत्वाचा आहे. पाठीच्या कण्यातील कोणतीही समस्या म्हणजे सर्व काही थांबलं समजायचं. माझे बरेच प्लॅन होते. मात्र या दुखण्यामुळे मला माझा शो देखील बंद करावा लागला.” असं कपिल म्हणाला.

यावेळी कपिलने त्याला आलेल्या अडचणींचा देखील खुलासा केला. अशा दुखण्यामुळे बऱ्याचदा चिडचीड होते असं तो म्हणाला. “तुम्ही अंथरुणात असता. तुम्हाला फक्त लिक्विड डाएट घ्यायला सांगितलं जातं. आधीच तुम्ही वेदनेत असता त्यात सलाडच खावं आणि अशा अनेक सूचना केल्या जातात त्यात वेदना अधिक वाढतात. मी या सर्वाचा सामना केलाय.” असं सांगत कपिलने त्याचं दु:ख व्यक्त केलं.

या वर्षाच्या सुरुवातीला कपिल शर्माचा शो बंद झाला होता. त्यानंतर पुन्हा नवा सिझन सुरु करण्यात आला. त्यावेळी कपिल शर्माने कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी ब्रेक घेत असल्याचं कारण सांगितलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kapil sharma open ups about him spine injury made him pull off the show kpw

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या