scorecardresearch

दारुच्या नशेत कपिल शर्मानं पत्नीला केलं होतं प्रपोज, पाहा व्हिडीओ

कपिल शर्माचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.

kapil sharma, ginni chatrath, kapil sharma wife, kapil sharma on netflix, कपिल शर्मा, गिन्नी चतरथ, कपिल शर्मा शो, कपिल शर्मा इन्स्टाग्राम
कपिलनं त्याच्या खासगी आयुष्याबाबत एक खुलासा केला आहे. ज्यामुळे सध्या तो सोशल मीडियावर चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी कॉमेडियन कपिल शर्माच्या बायोपिकची घोषणा झाली. त्यानंतर तो सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत आहे. कपिल शर्मा शोच्या यशस्वी कमबॅकनंतर आता लवकरच कपिल ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पदार्पण करत आहे. त्याचा ‘आय एम नॉट डन यट’ हा शो लकरच नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. पण त्याआधी कपिलनं त्याच्या खासगी आयुष्याबाबत एक खुलासा केला आहे. ज्यामुळे सध्या तो सोशल मीडियावर चर्चेत आहे.

कपिल शर्माचा आगामी शो ‘आय एम नॉट डन यट’चा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. या प्रोमोमध्ये कपिलनं त्याच्या खासगी आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. ‘पत्नी गिन्नी चतरथला लग्नासाठी प्रपोज केलं तेव्हा मी दारुच्या नशेत होतो.’ असं त्यानं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. कपिलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कपिल म्हणतो, ‘सर्व कलाकारांमध्ये गिन्नी मला खूप आवडत होती. आम्ही एकत्र थिएटर केलं होतं. त्यावेळी मी तिला बरीच काम देत असे. त्यासाठी ती मला कॉल करत असे आणि सांगत असे आज हे झालं, ते झालं. एकदा तिने मला असंच कॉल केला. त्यावेळी मी ऑफिसर्स चॉइस प्यायलो होतो. मी कॉल रिसिव्ह केला आणि तिला विचारलं तुझं माझ्यावर प्रेम आहे का? ती घाबरली आणि म्हणाली, काय? या व्यक्तीची हिंमत कशी झाली असं विचारण्याची? मला वाटतं बरं झालं मी त्यावेळी नशेत होतो. नाहीतर मी गिन्नीला हा प्रश्न विचारू शकलो नसतो.’

दरम्यान कपिल शर्माचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची घोषणा निर्माता महावीर जैन यांनी अलिकडेच केली आहे. कपिल शर्माच्या जीवनावर आधारित ‘फनकार’ या बायोपिकचं दिग्दर्शन मृगदीप सिंह लांबा करणार आहेत. कपिल शर्माच्या कामाबद्दल बोलायचं तर लवकरच त्याचा ‘कपिल शर्माः आय एम नॉट डन येट’ हा शो नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kapil sharma reveal that he proposed his wife ginni chatrath after drunk mrj

ताज्या बातम्या