“जेव्हा बिग बींनी कपिल शर्माची मागितली होती माफी”; शेअर केला किस्सा

बिग बींनी एकदा कपिल शर्माची माफी मागतली होती याबद्दल कपिल शर्माने खुलासा केला

kbc-13-kapil-sharma-amitabh-bachchan
(Photo-Instagram@sonytv)

‘कौन बनेगा करोडपती १३’च्या शानदार शुक्रवारच्या भागात यंदा विनोदवीर कपिल शर्मा आणि अभिनेता सोनू सूदने हजेरी लावली होती. या खास भागात कपिलने त्याच्या कॉमेडीने शोला चार चाँद लावले. यावेळी शोमध्ये कपिल शर्माने बिग बींचा एक खास किस्सा शेअर केला. बिग बींनी एकदा कपिल शर्माची माफी मागतली होती याबद्दल कपिल शर्माने खुलासा केला.

बिग बी अमिताभ बच्चन यांनी या खास भागत सोनू सूद आणि कपिल शर्मासोबच मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी बिग बींनी कपिल शर्मा शोमध्ये वेळेत पोहचल्याचं म्हणत थट्टा केली. यावरून कपिल शर्माने बिग बींसोबतचा एक अनुभव शेअर केला. ज्यावेळी बिग बींनी सगळ्यांसमोर माफी मागितली होती. तो म्हणाला, ” बच्चन सर आमच्या शोमध्ये येणार होते. आमच्या प्रोमो शूटची वेळ होती नऊ वाजताची. मी तर सेटवर सहा वाजताच पोहचलो होतो. सूट वैगरे घालून तयार झालो. बच्चन सर बरोबर नऊ वाजून दोन मिनिटांनी पोहचले. त्यानंतर बच्चन सर असं काही म्हणाले जे मी आजही विसरू शकलेलो नाही.” असं कपिल म्हणाला.

लग्नाच्या चर्चांवर आलिया भट्टने दिलं उत्तर, चाहत्यांना टाकलं कोड्यात!

पुढे कपिल म्हणाला, ” बच्चन सर सेटवर येऊन म्हणाले. माफ करा मी दोन मिनिटं लेट झालो. तेव्हा मला वाटलं दोन मिनिटं पण काय लेट असतं.” कपिल शर्माने सांगितलेल्या या किस्स्यावरून अमिताभ बच्चन यांची शिस्तबद्धता लक्षात येते.


याशोमध्ये सोनू सूदने देखील कपिल शर्माच्या फिटनेस ट्रेनिंगचा धमाल किस्सा शेअर केला. कशा प्रकारे सोनू सूदने कपिल शर्माला फिटनेटकडे लक्ष देण्यास भाग पाडलं हे सोनूने सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kapil sharma reveals ones amitabh bachchan apologized him on set in kbc 13 kpw

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या