ये औरत मेरी कूर्सी खा गई…

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे

वादग्रस्त व्यक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते नवज्योत सिंग सिद्धू ‘द कपिल शर्मा शो’पासून लांब आहेत. पण सध्या सोशल मीडियावर कपिल शर्मा शोमधील व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये ते परतले असल्याचे दिसत आहे. ते ही एकदम वेगळ्या अंदाजात.

सोनी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी भागाचा प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिचा चित्रपट ‘हंगामा २’च्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये पोहोचली आहे. कपिलच्या संपूर्ण टीमने शिल्पासोबत मजेशीर अंदाजात गप्पा मारल्या. त्याचवेळी कपिल शर्मा सिद्धू यांच्या रुपात तेथे पोहोचतो. शोमध्ये परीक्षकाच्या खूर्चीत बसलेल्या अर्चना पुरण सिंगला सिद्धूच्या वेशातील कपिल टोला लगावतो.

‘तु अपने शो में छा गई, ये औरत मेरी कुर्सी खा गई’ असे कपिल अर्चना पूरण सिंगवर निशाणा साधून शिल्पा शेट्टीला म्हणतो. त्यावर बच्चा यादवला राग येतो. तो सिद्धूच्या वेशातील कपिल शर्माला ‘तू तुझ्या मर्यादा ओलांडत आहेस’ असे म्हणतो. त्यावर कपिल लगेच प्रत्युतर देतो आणि म्हणतो ‘मी याच सीमा नाहीत तर देशाचाही सीमा ओलांडल्या आहेत.’ हे ऐकून प्रेक्षकांमध्ये हास्याची लाटच पसरते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kapil sharma show sidhu said to archana puran singh you acquire my chair avb

Next Story
गॉसिप