scorecardresearch

Video: किसिंग सीनसाठी कोस्टारला पाच वेळा…; कपिल शर्माचा नेहा धूपियाबाबत खुलासा

सध्या कपिल शर्मा शो मधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच चर्चेत असणारा शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो.’ या शोचा सूत्रसंचालक कपिल शर्मा आणि त्याची संपूर्ण टीम प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसते. अशातच शोमध्ये येणारे पाहुणे शोला आणखी चार चाँद लावताना दिसतात. दरम्यान, कपिल शर्मा शोमधील कपिलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो अभिनेत्री नेहा धूपियाविषयी खुलासा करताना दिसत आहे.

अभिनेत्री नेहा धूपिया आणि यामी गौतम त्यांच्या आगामी चित्रपट ‘दस काहानीया’च्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये पोहोचल्या आहेत. त्या दोघीही संपूर्ण टीमसोबत मजामस्ती करताना दिसतात. सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये कपिल नेहा धूपियासोबत मजामस्ती करताना दिसत आहे.
Video: अंतर्वस्त्र घालायला विसरली का?; कपड्यांमुळे अभिनेत्री झाली ट्रोल

‘दस कहानीया’ या चित्रपटात नेहा धूपियाला कोस्टारच्या हाताला किस करायचे होते. या विषयी बोलताना कपिल म्हणाला, ‘तिने या किसिंग सीनसाठी कोस्टारला पाच वेळा हात धुवायला लावला. तिला आरोग्याची प्रचंड काळजी आहे.’ ते ऐकून सर्वांना हसू अनावर होते. यावर उत्तर देत नेहा म्हणते, ‘माझे लग्न झाले आहे. मी असे काही नियम पाळत नाही.’

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kapil sharma talks about how neha dhupia once asked a co star to wash his hand 5 times avb

ताज्या बातम्या