प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य कसं आणता येईल हे कॉमेडी किंग कपिल शर्माला चांगलंच ठाऊक आहे. कॉमेडी विश्वासामध्ये कपिलचं नाव अगदी टॉपला आहे. तो त्याचं काम अगदी उत्तम पद्धतीने करतो हे आपण पाहत आलो आहे. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणं हे फार कठीण काम, पण कपिल यामध्ये राजा आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तो नेहमीच सज्ज असतो. कपिल त्याच्या शोमध्ये आलेल्या अभिनेत्रींबरोबर फर्ल्ट करत असतानाचे बरेच व्हिडीओ बहुदा सगळ्यांनी पाहिले असावेत. फक्त शोमध्येच नव्हे तर दुबईमध्ये जाऊन देखील कपिलने एका मुलीबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा तो प्रयत्न चांगलाच फसला.

कपिलने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. दुबईमध्ये एका सुंदर मुलीला कपिल लिफ्ट देताना दिसत आहे. या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी त्याची ही सगळी धडपड सुरु आहे. मात्र ही धडपड कपिलला चांगलीच महागात पडली असल्याचं यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. ज्या कारमध्ये कपिल त्या मुलीला कारमध्ये बसण्यासाठी सांगतो पण ती कार त्याची नसतेच. इतक्यातच त्याची रिल लाईफ पत्नी सुमोना चक्रवर्ती तिथे येते आणि त्या मुलीला सगळं सत्य सांगते.

garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
pune kothrud area fire broke out godown pandal material
कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामाला आग
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

दुबईच्या रस्त्यावर ज्या मुलीला कपिल लिफ्ट देतो ती मुलगी म्हणजे अभिनेत्री रोशनी चोप्रा. रोशनी कपिलचं त्याच्या रिल लाईफ पत्नीकडून सत्य ऐकते अन् भररस्त्यात त्याच्या कानशिलात लगावते. त्याचा हा मजेशीर व्हिडीओ नेटकऱ्यांच्या देखील भलताच पसंतीस पडला आहे.

आणखी वाचा – नवाजुद्दीनच्या बॉडीगार्डने चाहत्यांबरोबर केलं असं काही की अभिनेताही भडकला, पाहा हा VIDEO

कपिल फक्त छोट्या पडद्याच्या माध्यमातूनच नव्हे तर सोशल मीडियाद्वारे देखील प्रेक्षकांना हसवण्याचा सतत प्रयत्न करत असतो. त्या कॉमेडी शोचा तर वेगळाच चाहतावर्ग आहे. तुम्ही त्याचा हा व्हिडीओ पाहिलात की तुमच्या चेहऱ्यावर देखील हसू नक्कीच येईल.