हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वात मोठं आणि दीर्घकाळ अधिराज्य करणारं शाही घराणं म्हणजे ‘कपूर घराण’ होय. ज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर यांनी या साम्राज्याचा पाया रचला आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक पिढीने आपापल्या परीने त्याचा विस्तार केला. पण कपूर कुटुंबात लग्न करुन गेलेल्या ‘अभिनेत्री’ सूनांनी आपल्या करिअरला रामराम ठोकला आहे. याबाबत कित्येक वर्षानंतर आता कपूर घराण्यातल्या एका सूनेनं पुढे येत मोठा खुलासा केलाय.

राज कपूर यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेणारे अभिनेते ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू सिंग कपूर यांनी मोठा खुलासा केलाय. नीतू सिंग कपूर आणि त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी या दोघी नुकत्याच ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये प्रमुख पाहुण्या बनून आल्या होत्या. या शोमध्ये बोलताना नितू सिंग कपूर यांनी त्यांच्या करिअरबाबत मोठा खुलासा केलाय.

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये नीतू सिंग कपूर यांनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण शेअर केले. यावेळी होस्ट कपिल शर्मा याने नीतू सिंग कपूर यांना त्यांनी ७० ते ८० च्या दशकात केलेल्या सुपरहिट चित्रपटांबद्दल विचारलं. त्यावर बोलताना नीतू सिंग कपूर म्हणाल्या, “मी १९७३ ते १९८० दरम्यान बरेच चित्रपट केले. वयाच्या पाचव्या वर्षात मी चित्रपटात काम करण्यास सुरूवात केली आणि वयाच्या २० व्या वर्षात मी लग्न केलं.”

आणखी वाचा: दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित; लेक रिद्धिमा झाली भावूक

आणखी वाचा: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा नीरज चोप्राला प्रश्न; म्हणाली….

यावेळी कपिल शर्माने नीतू सिंग कपूर यांना एक प्रश्न केला. आधी चित्रपच करायची इच्छा होती की लग्न ? असं विचारल्यानंतर नीतू सिंग कपूर म्हणाल्या, “माझ्याकडे प्रसिद्धीच्या व्यतिरिक्त आणखी काही नव्हतं. कारण मी एक सुपरस्टार होती. ज्यावेळी मी माझ्या बाल्कनीच्या बाहेर येत होती, त्यावेळी समोर जवळजवळ ३०० ते ४०० लोक जमा झालेले दिसायचे. पण मग त्यानंतर माझ्या आयुष्यात ऋषी कपूर आले. त्यांच्यासोबत लग्न केल्यानंतर चित्रपट आणि ऋषी कपूर या दोन बाजूंना सांभाळणं थोडं अवघत जात होतं. म्हणून मी चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला.”

यापुढे बोलताना नीतू सिंग कपूर म्हणाल्या, “मला आराम करायचा होता. कारण मी गेली १५ वर्ष न थकता काम केलं होतं. या १५ वर्षात मी अध्ययन, शूटिंग आणि बरंच काही होतं. म्हणूनच आधीच्या १५ वर्षातील संघर्षात मी स्वतःला व्यस्त ठेवलं होतं. मी २० व्या वर्षात लग्नात केलं आणि त्याच्या एक वर्षानी मला रिद्धिमा झाली.”