“मी तरुण दिसण्यासाठी बोटॉक्स करू का?” करण जोहरने प्रश्न विचारताच आई म्हणाली…

करणने ‘वन माइक स्टॅंड सीजन २’ या शोमध्ये हा खुलासा केला आहे.

karan johar, karan johar mother on botox,
करणने 'वन माइक स्टॅंड सीजन २' या शोमध्ये हा खुलासा केला आहे.

दिग्दर्शक करण जोहर हा बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहे. करणला आपण बऱ्याचवेळा अनेक शोमध्ये सुत्रसंचालन करताना पाहिलं आहे. मात्र, यावेळी करण एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला भेटायला येणार आहे. नुकताच ‘वन माइक स्टॅंड सीजन २’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या शोमध्ये करण जोहरसोबत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यावेळी करणने खुलासा केली की तरूण दिसण्यासाठी तो बोटॉक्स करण्याचा विचार करत होता.

या प्रोमो करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला करण ग्रीन रूममध्ये असल्याचे दिसते. तो त्यांच्या अॅक्टची तयारी करत असतो. यावेळी करण बोलतो, “मला कधी स्टेजवर जाण्याची भीती वाटली नाही, पण यावेळी मला भीती वाटते की, मी कोणता विनोद केला आणि प्रेक्षकांना तो आवडला नाही आणि ते हसले नाही तर.”

आणखी वाचा : घटस्फोटानंतर समांथाने केली मोठी घोषणा!

थोड्या वेळात करण स्टेजवर जातो आणि बोलतो, “एकदा मी आईला माझ्या चेहऱ्यावर असलेल्या फिलर्स किंवा बोटॉक्स करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. त्यावर तिचे मत काय आहे असे मी तिला विचारले.” त्यावर आई म्हणाली, “तुझा चेहरा तर ठीक आहे. तुझ्या चित्रपटाच्या स्क्रिप्ट्सला नक्की फिलर्सची गरज आहे.”

आणखी वाचा : सैफसोबत लग्न करण्यासाठी करीनाने आई-वडिलांना दिली होती ‘ही’ धमकी

या शोमध्ये करण जोहरसोबत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. यात सनी लिओनी, रफ्तार, लेखक चेतन भगत, न्युज अॅंकर फे डिसूजा दिसणार आहेत. ‘वन माइक स्टॅंड’चा हा २ सीझन आहे. हा शो आपल्याला २२ ऑक्टोबर पासून अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. या शोचे सुत्रसंचालन सपना वर्मा करणार आहे. या सगळ्यांच्या व्यतिरिक्त कॉमेडियन सुमुखी सुरेश, समय रायना, नीती पाल्टा, अतुल खत्री आणि अबिश मॅथ्यु देखील शोमध्ये दिसतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Karan johar reveals his mom answer when he asked her advice on getting botox dcp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या