प्रसिध्द बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर सातत्याने चर्चेत असतो. ‘कॉफी विथ करण’ हा त्याचा शो कायमच त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो. नुकतंच एका मुलाखतीत करणने कलाकारांच्या स्टारडमबद्दल एक वक्तव्य केले आहे. त्यात त्याने सोशल मीडियामुळे स्टारडमचे स्वरूप बदलले असल्याचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अमर उजाला’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत करणने कलाकारांचे स्टारडम आणि त्यात झालेला बदल यावर त्याचे मत मांडले. यात तो म्हणाला, “सोशल मीडियामुळे कलाकारांचे स्टारडम, त्यांची प्रसिद्धी यांमध्ये खूप फरक पडताना दिसत आहे. आत्ताच्या पिढीला स्टारडम म्हणजे काय? हे कदाचित अनुभवता येणार नाही. यापूर्वी अभिनेते राजेश खन्ना यांच्यापासून अक्षय कुमारपर्यंत सगळ्यांचे स्टारडम होते. लहानपणी जेव्हा एखाद्या पार्टीमध्ये अमिताभ बच्चन यायचे, तेव्हा ते कोणते कपडे घालणार आहेत हे बघण्यासाठी आम्ही उत्सुक असायचो. प्रत्येक ठिकाणी त्यांना पाहणे शक्य नव्हते. फक्त प्रीमियर किंवा एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले असल्यास त्यांचे फोटो पाहता यायचे. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता असायची.”

आणखी वाचा – Koffee with Karan 7 नंतर विजय देवरकोंडा आहे करण जोहरवर नाराज? नेमकं काय आहे सत्य

करण पुढे म्हणाला, “सोशल मीडियामुळे चाहत्यांमधील आवडत्या कलाकाराबद्दल सर्वकाही जाणून घेण्याची उत्सुकता संपली आहे. कारण आपल्या आवडत्या कलाकाराचे सगळे अपडेट सोशल मीडियावर उपलब्ध असतात. चित्रपटांबद्दल बोलायचे तर माझे वडील नेहमी म्हणायचे की, ‘यशस्वी होणारा चित्रपट हा चांगला चित्रपट असतो’. जेव्हा एखादा चांगला चित्रपट बनवला जातो आणि जर तो प्रेक्षकांना देखील आवडला, तर तो चित्रपट नक्की यशस्वी होतो. त्यामुळे सोशल मीडियामुळे जरी चाहत्यांची उत्सुकता कमी होत असेल, तरी चित्रपटांवर त्याचा परिणाम होतो असं मला वाटत नाही. चित्रपट चांगला असेल आणि प्रेक्षकांना आवडला तर नक्कीच तो यशस्वी होतो.”

आणखी वाचा – “बॉलिवूड संपुष्टात” म्हणणाऱ्यांना करण जोहरचं उत्तर, म्हणाला …

सध्या करणचा ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाचा सातवा सीझन सुरु आहे. तसेच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा करण जोहरचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतच पूर्ण झालंय. या चित्रपटात आलिया भट्ट, रणवीर सिंह, धर्मेंद्र, शबाना आजमी, जया बच्चन आणि प्रीति झिंटा हे कलाकार झळकणार आहेत. शिवाय जवळपास सहा वर्षांनंतर या सिनेमासाठी करण जोहरने पुन्हा एकदा दिग्दर्शन केलंय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar says social media has ended the stardom of actors pns
First published on: 13-08-2022 at 12:14 IST