सध्या देशभरामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची तुफान चर्चा आहे. राजकीय वादाबरोबरच या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि कमाईचे आकडेही सतत बातम्यांचा विषय ठरत आहेत. या चित्रपटावरुन रोज काही ना काही वक्तव्य आणि दावे केले जात आहेत. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. अनेक सेलिब्रिटींनी या चित्रपटाची स्तुती केली आहे. तर आता यात बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरचेही नाव समोर आले आहे.

करणने नुकतीच Galatta Plusला मुलाखत दिली होती. यावेळी करण चित्रपट आणि स्क्रिप्टिंग विषयी बोलताना म्हणाला “काश्मीर फाइल्स हा चित्रपट इतर अनेक चित्रपटांप्रमाणे बजेटमध्ये बनलेला नाही. पण कदाचित हा भारतीय चित्रपटातील सर्वात मोठा हिट ठरेल. मी बॉक्स ऑफिस इंडियावर वाचल, तिथे त्यांनी सांगितले की जय संतोषी मां, १९७५ पासून अशी चळवळ झाली नाही.”

आणखी वाचा : “…असले घाण आरोप कोणी लावू नका”, विशाखा सुभेदारने घेतला ‘हास्य जत्रा’ सोडण्याचा निर्णय

आणखी वाचा : धकधक गर्ल आणि रितेश देशमुखचा ‘कच्चा बादाम’वर डान्स, ४० लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला हा Viral Video

पुढे करण म्हणाला, “तुम्हाला हे मान्य करावे लागेल की अशा काही गोष्टी आहेत, ज्याचा संबंध आपल्या देशाशी आहे आणि एक अभ्यासक बनून तुम्हाला हा चित्रपट पाहणे गरजेचे आहे. तुम्हाला ते आत्मसात करण्यासाठी आणि त्यातून शिकण्यासाठी हा चित्रपट पहावाच लागेल, ही एक चळवळ आहे जी आता निर्माण झाली आहे. आता हा केवळ एक चित्रपट नाही तर एक चळवळ आहे.”

आणखी वाचा : Hindu New Year 2022 Horoscope : पुढचे १ वर्ष या राशींच्या लोकांवर होणार लक्ष्मी मातेची कृपा

कंगना रणौत आणि अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या चित्रपटाची स्तुती केली आहे. या चित्रपटाने २२८ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरित जीवनावर आधारित आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे. हा चित्रपट अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे.