“मला ते भाग्य लाभलं”; शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्ताने करण जोहरने शेअर केली खास पोस्ट

करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शाहरुख खानसोबतचे काही जुने फोटो शेअर केले आहेत.

Karan-Johar-1
(Photo-Instagram@karanjohar)

मुलाच्या अटकेमुळे सध्या चांगलाच चर्चेत आलेला अभिनेता आणि बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसापूर्वीच मुलाची म्हणजे आर्यन खानची सुटका झाल्याने शाहरुख कुटुंबासोबत त्याचा वाढदिवस साजरा करतोय. तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी शाहरुखला त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. यातच शाहरुखचा जवळचा मित्र आणि निर्माता करण जोहरने देखील एक खास पोस्ट शेअर करत शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शाहरुख खानसोबतचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने शाहरुखसोबतची पहिली भेट आणि त्यांच्यातील मैत्रीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये तो म्हणाला, “मी त्याला करण अर्जुनच्या सेटवर पहिल्यांदा भेटलो. मी, काजोल आणि माझे वडील फिरण्यासाठी निघालो होतो. तेव्हा मला कल्पनादेखील नव्हती की मी एका अशा व्यक्तीला भेटणार आहे जो माझ्या आयुष्याला, माझ्या करिअरला आणि माझ्या अस्तित्वाला आकार देईल. त्याचा करिष्मा आणि बुद्धिमत्ता संपूर्ण जगाला माहितेय. पण मला त्याची माणुसकी आणि प्रेम अनुभवण्याचं भाग्य लाभलं.” असं करण या पोस्टमध्ये म्हणालाय.

“लोकांचं हे अज्ञान आहे”; मस्कुलर बॉडीवरून तापसी पन्नूला ट्रोल करणाऱ्यांना कृष्णा श्रॉफचा सल्ला

श्वेता तिवारीची मुलगी पलकने जिंकलं सलमान खानचं मनं, ‘बिजली’ गाण्यासाठी भाईजानने दिल्या शुभेच्छा

पुढे त्याने लिहिलंय, “तो एक उत्तम पिता, एक जबाबदार पती, एक प्रेमळ भाऊ आणि आयुष्यात महत्वाचं स्थान असलेला मित्र आहे… आणि तो बरचं काही आहे. लव्ह यू भाई…तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो.” असं म्हणत करणने शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शाहरुख आणि करणची मैत्री जगजाहीर आहे. करणने १९९८ सालामध्ये आलेल्या ‘कुछ कुछ होता है’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पादर्पण केलं होतं. त्यानंतर त्याने शाहरुखसोबत ‘कभी खुशी कभी गम’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘माय नेम इज़ खान’ या सिनेमांमध्ये एकत्र काम केलंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Karan johar share bunch of memories and extensive note on shah rukh khan birthday kpw

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या