पुन्हा एकदा ट्रोल होतोय करण जोहर; बिग बॉस शो बायकॉट करण्याची होतेय मागणी

बिग बॉस ओटीटीचा होस्ट म्हणून करण जोहरचं नाव जाहीर झाल्यानंतर बिग बॉस प्रेमी मात्र हैराण झाले. सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले आहेत.

karan-johar-bigg-boss-ott-host
(Photo: Karan/Instagram)

‘बिग बॉस १५ ओटीटी’चं होस्टिंग ‘दबंग’ अभिनेता सलमान खान नव्हे तर करण जोहर करणार असल्याचं नुकतंच जाहीर करण्यात आलं. केवळ बिग बॉस ओटीटीसाठी ६ आठवड्यांचं होस्टिंग करण जोहर करणार आहे. खरं तर यासाठी सिडनाज किंवा बिग बॉस १४ चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याला होस्ट म्हणून घेण्याची मागणी मध्यंतरी जोर धरू लागली होती. पण अचानक करण जोहरच्या नावाची घोषणा केल्यानंतर बिग बॉस प्रेमी मात्र हैराण झाले.

बिग बॉस ओटीटीचा होस्ट म्हणून करण जोहरचं सोशल मीडियावर काही खास स्वागत होताना दिसून येत नाही. करण जोहरला नेहमीच हेटर्स मूव्ही माफिया, नेपोटिझम किंग म्हणत ट्रोल केलं जातं. करण जोहरची हिच प्रतिमा त्याला वेळोवेळी अडचणीत अडकवते. मूव्ही माफिया म्हणून आतापर्यंत अनेकदा ट्रोल होत असलेला करण जोहर पुन्हा एकदा नेटकऱ्यांचं टार्गेट बनलाय. बिग बॉस ओटीटीचं होस्टिंग करण जोहर करतोय, त्यामूळे बिग बॉस शो बॉयकॉट करा, अशी मागणीच नेटकऱ्यांनी लावून धरलीय. तर दुसरीकडे सिद्धार्थ शुक्ला होस्ट करणार अशी आशा लावून धरलेल्या फॅन्सना सुद्धा मेकर्सचा हा निर्णय खटकला आहे.

करण जोहरला ट्रोल करतानाचे वेगवेगळे मीम्स देखील व्हायरल होऊ लागले आहेत. करण जोहर बिग बॉस ओटीटी होस्ट करत असेल तर याची अवस्था रणबीर कपूरच्या बॉम्बे वेलवेटपेक्षाही वाईट होईल, अशा कमेंट्स करत करण जोहरवर मीम्स शेअर केले जात आहेत. एक दुसऱ्या युजरने लिहिलं, “मूव्ही माफिया करण जोहरला आता शो सुद्धा मिळू लागले…आता ओटीटी प्लॅटफॉर्मना सुद्धा बायकॉट करावं लागणार…”. कित्येकांनी तर करण जोहरला झेलावं लागणार असं म्हणत आहेत. आणखी एका युजरने लिहिलंय, “करण जोहरच्या जागी रोहित शेट्टीला घेतलं तरी परवडलं असतं”

करण जोहरने सांगितलं होतं की, तो बिग बॉसचा खूप मोठा फॅन आहे. यंदाचा बिग बॉस ओटीटीवर विकेंडचा वार आपल्या अनोख्या स्टाइलमध्ये होस्ट करणार, असं देखील करण जोहरने म्हटलं होतं. हे पाहणं फॅन्ससाठी खूपच मजेदार असणार आहे. आता करण जोहर प्रेक्षकांचं मन जिंकण्यात किती यशस्वी होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Karan johar troll as he turns host for bigg boss ott memes viral prp