scorecardresearch

भारती सिंहच्या डिलिव्हरीबाबत करण जोहरला सतावतेय चिंता, म्हणाला…

कॉमेडियन भारती सिंह लवकरच आई होणार आहे.

karan johar, parineeti chopra, bharati singh, harsh limbachia, bharati singh delivery, bharati singh pregnancy, भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, करण जोहर, परिणिती चोप्रा, भारती सिंह प्रेग्नन्सी
करण जोहर भारतीच्या डिलिव्हरीबद्दल चिंता व्यक्त करताना दिसत आहे.

कॉमेडियन भारती सिंह मागच्या काही काळापासून तिच्या प्रेग्नन्सीमुळे सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत आहे. भारती सिंह एप्रिल महिन्यात बाळाला जन्म देण्याची शक्यता आहे. पण प्रेग्नन्सीमध्ये ती पूर्णवेळ काम करताना दिसत आहे. सध्या ती ‘हुन्नरबाज’ शोचं सुत्रसंचालन करताना दिसतेय. या शोच्या मंचावरील एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. ज्यात करण जोहर भारतीच्या डिलिव्हरीबद्दल चिंता व्यक्त करताना दिसत आहे.

कलर्स टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडियावर अकाउंटवरून नुकताच या शोचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला. ज्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये करण जोहर भारती सिंहच्या प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीबद्दल बोलताना दिसत आहे. तो म्हणतो, ‘भारती तुला खूप सारं प्रेम पण मला काळजी वाटते की जर तुझं बाळ इथे सेटवरच जन्माला आलं तर.’ त्यावर भारती देखील मजेदार अंदाजात म्हणते, ‘हो खरं आहे कधीही काही होऊ शकतं असं डॉक्टर म्हणाले आहेत.’

याशिवाय या व्हिडीओमध्ये परिणिती चोप्रा, करण जोहर मिळून भारती आणि हर्ष यांना त्यांच्या बाळाचं नाव काय ठेवावं याविषयी सल्ला देताना दिसतात. परिणिती आणि करण मजेदार अंदाजात भारतीला सांगतात, ‘जर मुलगा झाला तर त्याचं नाव ‘हुन्नर’ आणि मुलगी झाली तर तिचं नाव ‘बाज’ असं ठेवता येईल.’ सध्या सोशल मीडियावर ‘हुन्नरबाज’चा हा नवा प्रोमो बराच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Karan johar worried about bharti singh delivery and baby video goes viral mrj

ताज्या बातम्या