‘बिग बॉस १५’च्या नुकत्याच पार पडलेल्या विकेंड का वारमध्ये होस्ट सलमान खानने जय भानुशाली, उमर रियाजसह प्रतीक सहजपालची चांगलीच शाळा घेतली. तर या भागात करण कुंद्रा भावूक झालेला पाहायला मिळाला. या भागात करण कुंद्राने त्याच्या बालपणाचा अनुभव शेअर केला. यावेळी त्याला अश्रू आवरणं कठीण झालं होतं.

तेजस्वी प्रकाशने करण कुंद्राला त्याने सर्वांना समजावण्याचा ठेका घेतला आहे का? असा प्रश्न विचारला. यावर करणने त्याची बाजू मांडली. एखाद्याला समजावणं गरजेचं आहे. तसचं त्याची बाजू ऐकून घेणं देखील गरजेचं आहे हे सांगताना करणने त्याच्या बालपणाचा अनुभव सांगितलं. जुन्या आठवणींना उजाळा देत असताना करण भावूक झाला होता.

जेव्हा बिग बींनी कपिल शर्माची मागितली होती माफी”; शेअर केला किस्सा

करण म्हणाला, “जेव्हा कुणी आपल्या जवळच्या व्यक्तीकडे व्यक्त होवू शकत नाही. त्याच्याशी मोकळेपणाने बोलू शकत नाही तेव्हा कसं वाटतं हे मी चांगलं समजू शकतो. लहान असताना मी अशा परिस्थितीचा सामना केलाय.” असं करण म्हणाला. “लहान असताना अनेकदा पालकांनी समजून घ्यावं. डोक्यावरून प्रेमाने हात फिरवावा असं वाटायचं मात्र त्याऐवजी मला अनेकदा ओरडाच मिळायचा.” असं तो म्हणाला.

“लहान असताना माझ्याकडे असं कुणी हवं होतं. ज्याच्याशी मी मोकळेपणाने बोलू शकलो असतो. असं झालं असतं तर आज मी या परिस्थितीत नसतो.” असं सांगत असताना यावेळी करण भावूक झाला.