दोन लग्न, चौथ्याच व्यक्तीशी अफेअर अन्...; बिपाशा बासूच्या नवऱ्याला पूर्वाश्रमीच्या पत्नीने मारली होती कानाखाली | karan singh grover love life his ex wife jennifer winget releationship unknown facts see details | Loksatta

दोन लग्न, चौथ्याच व्यक्तीशी अफेअर अन्…; बिपाशा बासूच्या नवऱ्याला पूर्वाश्रमीच्या पत्नीने मारली होती कानाखाली

करण सिंह ग्रोवरचं बिपाशा बासूबरोबर हे तिसरं लग्न आहे. पण त्याच्या दुसऱ्या पत्नीची करणने फसवणूक केली होती.

दोन लग्न, चौथ्याच व्यक्तीशी अफेअर अन्…; बिपाशा बासूच्या नवऱ्याला पूर्वाश्रमीच्या पत्नीने मारली होती कानाखाली
करण सिंह ग्रोवरचं बिपाशा बासूबरोबर हे तिसरं लग्न आहे. पण त्याच्या दुसऱ्या पत्नीची करणने फसवणूक केली होती.

बिपाशा बासू व करण सिंह ग्रोवर सुखाचा संसार करत आहेत. लवकरच या सेलिब्रिटी कपलच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. पण लग्नापूर्वीच करण त्याच्या खासगी आयुष्यामुळे बराच चर्चेत होता. हे त्याचं तिसरं लग्न आहे. याआधी अभिनेत्री जेनिफर विंगेटला डेट करत तिच्याशी लग्न करण्याचा त्याने निर्णय घेतला. पण या दोघांच्या नात्यामध्ये कटुता निर्माण झाली. दोन वर्षांमध्येच या जेनिफर-करणचा घटस्फोट झाला. इतकंच नव्हे तर जेनिफरने करणवर फसवणूकीचा आरोपही केला होता.

आणखी वाचा – बँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”

जेनिफर ही करणची दुसरी पत्नी होती. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार करणला जेनिफरने एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर रंगेहात पडकलं होतं. आपल्या पतीला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर पाहिल्यानंतर जेनिफरला राग अनावर झाला. तिने रागात त्याच्या कानाखाली मारली होती.

‘दिल मिल गए’ मालिकेच्या सेटवर जेनिफरने त्याच्या कानाखाली मारली असल्याची बातमी सगळीकडे तेव्हा वाऱ्यासारखी पसरली होती. या प्रसंगानंतर दोघांनी एकमेकांशी बोलणं टाळलं होतं. इतकंच नव्हे तर ‘दिल मिल गए’ मालिकेमध्ये एकत्र सीन चित्रीत करण्यासही या दोघांचा नकार होता. एक्स गर्लफ्रेंड निकोलसाठी करण त्याची पहिली पत्नी श्रद्धाला टाळत असल्याचं काही काळानंतर जेनिफरला समजलं.

आणखी वाचा – दीपिका पदुकोणची प्रकृती बिघडली, मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती

दुसऱ्या व्यक्तीबरोबर अफेअर असल्यामुळे करणचे दोन्ही घटस्फोट झाले. जेव्हा करणने पहिली पत्नी श्रद्धा निगमबरोबर लग्न केलं तेव्हा तो कोरियोग्राफर निकोलला डेट करत होता. याबाबत त्याने स्वतः खुलासादेखील केला. पहिल्या पत्नीशी घटस्फोट आणि निकोलशी ब्रेकअप झाल्यानंतर त्याने जेनिफरला डेट करण्यासा सुरुवात केली होती. जेनिफरबरोबर घटस्फोट झाल्यानंतर ‘अलोन’ चित्रपटाच्या सेटवर करण-बिपाशा यांच्यामध्ये जवळीक वाढली. सध्या हे दोघं त्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये रमले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“मी पहिल्यांदा शाहरूखला बघितलं अन्…” अभिनेत्री जुही चावलाने केला खुलासा

संबंधित बातम्या

ती सध्या काय करते…, जाणून घ्या कॅप्टन विक्रम बत्रांच्या प्रेयसीबद्दल
“जरा दोन दिवस…”, ऋतुराजच्या सामन्या आधी नेटकऱ्यांनी सायलीला दिला सल्ला
मी व समीर जन्मानं हिंदूच, कधीही धर्म बदलला नाही – क्रांती रेडकर
गुल्लक: निखळ आनंदाची पिगी बँक
“हिंदी चित्रपट साऊथमध्ये डब करा, तुम्हाला कोणी थांबवलंय?”, श्रेयस तळपदेचा सवाल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावला येणं अनुकूल नाही”, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंचा इशारा
पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेची निवड यादी जाहीर; यंदा डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शारीरिक चाचणी
‘मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या निर्णयाला जाणीवपूर्वक उशीर’; शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा आरोप
विजय दिवस सोहळ्यात यंदा भरगच्च कार्यक्रम; रौप्यमहोत्सवानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, शरद पवार यांना निमंत्रण
FIFA WC 2022: मोक्याच्या क्षणी ह्वांग ही चॅन चा गोल! द. कोरिया बाद फेरीत दाखल, मात्र जिंकूनही उरुग्वे विश्वचषकातून बाहेर